News Flash

Video: एकमेकांचे वैरी सिद्धार्थ-रश्मी अचानक ‘बिग बॉस’च्या घरात करु लागले रोमान्स

चाहत्यांनाही पडला प्रश्न

छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा शो कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा ठरत असतो. त्याचप्रमाणे यंदाचं पर्वदेखील चांगलंच गाजताना दिसत आहे. बिग बॉसचं हे १३ वं पर्व असून रोज घरामध्ये नवनवीन किस्से रंगताना पाहायला मिळतात. सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम यांच्यात झालेल्या भांडणानंतर घरामध्ये एक प्रकारे फूट पडली होती. मात्र आता घरातील हे संघर्षाचं वातावरण निवळं असून त्याजागी घरात प्रेमाचा वर्षा होतांना पाहायला मिळत आहे. अनेक वेळा एकमेकांशी वाद घालणारे सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यात प्रेमाचं अंकूर फुटतं असल्याचं दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर या शोचा नवा प्रोमो व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात सिद्धार्थ आणि रश्मी रोमान्स करताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बिग बॉसच्या घरातील एका टास्क दरम्यानचा आहे. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना चित्रपटाचं चित्रीकरण करण्यास सांगण्यात आलं आहे. यात शहनाज चित्रपटाची दिग्दर्शक असून तिला सिद्धार्थ आणि रश्मीचा रोमॅण्टीक सीन शूट करण्यास सांगितलं आहे. विशेष म्हणजे रोज वैऱ्यासारखे भांडणाऱ्या या दोघांना असं एकत्र पाहून घरातील सदस्यांनाही आनंद झाला.


दरम्यान, या टास्कच्या माध्यमातून रश्मी आणि सिद्धार्थमध्ये मैत्री होईल की त्यांच्यातील वैर कायम राहिलं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या घरात रोज नवनवीन किस्से घडत असून गेल्या आठवड्यामध्ये भोजपुरी अभिनेता खेसारीलाल यादव घरातून बाहेर पडला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 1:54 pm

Web Title: bigg boss 13 sidharth shukla and rashami desai new romantic promo video ssj 93
Next Stories
1 जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाने घेतल्या हार्मोन्सच्या गोळ्या
2 “ही जाणीवपूर्वक बदनामी”,अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या वकिलाचा खुलासा
3 महागड्या गाड्यांचा शौकीन जॉन; पाहा व्हिडीओ
Just Now!
X