25 August 2019

News Flash

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत केळकर घरातून अचानक गायब ?

अभिजीत अचानकपणे कुठे गेला? त्याला कोण घेऊन गेलं? असे अनेक प्रश्न घरातल्या सदस्यांना पडले आहेत

अभिजीत केळकर

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रोज नवनवीन टास्क रंगत असतात. घरातल्या सदस्यांना रोज नव्या आव्हानांना, कठीण प्रसंगांना सामोर जावं लागत असतं. मात्र तरीदेखील या साऱ्यावर मात करत घरातील सदस्य स्वत:ला या खेळामध्ये टिकून ठेवतात. घरामध्ये असे अनेक सदस्य आहेत, जे उत्तम टास्क खेळण्याच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिजीत केळकर. मात्र घरातील तगडा स्पर्धक म्हणून ओळखला जाणारा अभिजीत घरातून अचानपणे गायब होणार आहे.

काही कामासाठी स्टोर रुममध्ये गेलेला अभिजीत अचानकपणे गायब होतो. मात्र त्याच्या जाण्याची चुणूकही घरातल्या सदस्यांना लागत नाही. मात्र अभिजीत अचानकपणे कुठे गेला? त्याला कोण घेऊन गेलं? असे अनेक प्रश्न घरातल्या सदस्यांना पडले आहेत.

दरम्यान, अभिजीतचं अचानकपणे जाणं हे त्यांच्या आगामी टास्कचा एक भाग आहे. ‘मर्डर मिस्ट्री’ असं या टास्कचं नाव असून या टास्कमध्ये आता किती सदस्यांना अचानकपणे गायब व्हावं लागणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

First Published on July 17, 2019 3:44 pm

Web Title: bigg boss marathi contestant abhijit kelkar disappeared ssj 93