News Flash

…म्हणून सलमानने कतरिनाला रोखलं

सलमान तिची जरा जास्तच काळजी घेतोय

सलमान खान, कतरिना कैफ, टायगर जिंदा है

भाईजान सलमान खान नेहमीच त्याच्या सहकलाकारांची काळजी घेतो. याचा प्रत्यय बऱ्याचदा त्याच्या सहकालाकारांनी शेअर केलेल्या अनुभवांवरुन आला. पण, असेही काही सहकलाकार आहेत ज्यांच्याविषयी या दबंग अभिनेत्याच्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ. सलमान कतरिनाची इतकी काळजी घेतो की, आगामी चित्रपटातील चित्रीकरणादरम्यान काही साहसदृश्यं करण्यापासूनही त्याने तिला रोखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या सलमान आणि कॅट आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाचा काही भाग Essaouira मध्येही चित्रीत केला जातोय.

‘टायगर जिंदा है’च्या निमित्ताने कॅट काही स्टंट्स करताना दिसणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांत रंगल्या होत्या. त्यातही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्ट पाहून ही गोष्ट सर्वांच्याच लक्षात आली होती की, तिचं एक वेगळं रुप या चित्रपटातून पाहता येणार आहे. कतरिनाने पोस्ट केलेले फोटो पाहता ती ‘अंडर वॉटर स्टंट्स’ आणि ‘सर्फिंग’ करत असल्याचंही लक्षात आलं. हे स्टंट्स स्वत:च करुन पाहण्याचं तिने ठरवलंही होतं. तिने त्यासंबंधीचा योग्य तो सरावही केला. पण, सलमानने कतरिनाला असा कोणताही स्टंट करण्यापासू्न रोखलं आहे. तिच्या बाबतीत हा अभिनेता सध्या जरा जास्तच काळजी घेत असून, स्टंट करताना कॅटला काही होऊ नये, असं सलमानला वाटत असल्यामुळे त्याने तिला रोखलं आहे.

कतरिनाने स्टंट करण्याऐवजी तिच्या डमीचा वापर करण्यात यावा यासाठी सलमान आग्रही आहे असंही म्हटलं जातंय. त्यामुळे या दबंग अभिनेत्याच्या डोक्यावर अजूनही कतरिनाचेच वारे स्वार आहेत असं म्हटलं जातंय. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यातही या दोघांची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली होती. प्रसारमाध्यमांसमोर कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापासून ते अगदी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने खास बेत आखण्यापर्यंत सलमानचा पुढाकार असल्याचं पाहायला मिळालं होतं.

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2017 9:31 am

Web Title: bollywood actor salman khan stops co star katrina kaif from shooting risky stunt scenes tiger zinda hai
Next Stories
1 PHOTOS : ‘लागिरं झालं जी’चा सैन्यदलाला सलाम
2 शब्दांच्या पलिकडले : जबरदस्त मैत्रीचे… ‘दिये जलते है फूल खिलते है’
3 करिष्मा कपूरच्या घरी चोरी करणारा गजाआड
Just Now!
X