महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वास्तव- द रिअॅलिटी’ या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही दणक्यात कमाई केली होती. संजय दत्तची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या चित्रपटातून अभिनेत्री नम्रता शिरोडकर, मोनिश बहल, संजय नार्वेकर, रिमा लागू आणि शिवाजी साटम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
समीक्षक आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. अशा या चित्रपटाच्या सिक्वलविषयी जेव्हा झूम संजय दत्तला एक प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा या प्रश्नाचं सुचक विधानात उत्तर देत संजयने सर्वांचच लक्ष वेधलं.
वाचा : काम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट
मुख्य म्हणजे याआधीही ‘वास्तव’चा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण, तरीही आता या चित्रपटाचा आणखी एक सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळत आहे. ‘वास्तव’च्या कथानकासह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार, असा प्रश्न ज्यावेळी त्याला विचारण्यात आला तेव्हा आपण अगदी शंभर टक्के अशा प्रकारच्या कथानकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. ‘वास्तव’च पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणं अशक्य आहे. पण, त्याच धर्तीवर आधारित काही गोष्टी सध्या आकारास येत आहेत’, असं तो म्हणाला. त्यामुळे आता संजूबाबा नेमकं कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 6:29 pm