‘ये ढाई किलो का हाथ जब किसी पे पड़ता है न, तो आदमी उठता नहीं उठ जाता है’ हा डायलॉग ऐकला की आपोआप अभिनेतो सनी देओल डोळ्यासमोर येतो. पिळदार शरीरयष्टी आणि संवाद कौशल्य याच्या जोरावर सनी देओलने ८०-९० चा काळ गाजवला. म्हणा पूर्वीसारखा सनीचा कलाविश्वात वावर राहिलेला नाही. मात्र, आजही तो प्रेक्षकांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे.
९० च्या काळात अनेक गाजलेल्या चित्रपटात काम करणारा सनी देओल हा अभिनेता धर्मेंद्र यांचा मुलगा आहे. १९ ऑक्टोबर १९५६ रोजी सनीचा जन्म झाला. विशेष म्हणजे सनी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव फार कमी जणांना माहित आहे.
सनी देओलचं खरं नाव अजय सिंग देओल असं आहे. मात्र, चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्याने नाव बदलल्याचं सांगण्यात येतं. ‘बेताब’ या चित्रपटाने सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत. पण या अपयशी ठरलेल्या चित्रपटांमधील त्याचे संवाद मात्र आजही त्याच्या चाहत्यांच्या ओठांवर आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 19, 2020 8:39 am