27 February 2021

News Flash

शुभमंगल सावधान! वरुण-नताशाने बांधली लग्नगाठ

अलिबाग येथील द मेन्शन हाऊस येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती हा लग्नसोहळा पार पडला.

photo credit : instagram

कलाविश्वातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरलेला अभिनेता वरुण धवनचा विवाहसोहळा अखेर संपन्न झाला आहे. वरुणने त्याची प्रेयसी नताशा दलालसोबत लग्नगाठ बांधली आहे. २२ जानेवारीपासून यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली होती आणि आज अखेर या दोघांनी साताजन्माची गाठ बांधली आहे.  सध्या सोशल मीडियावर या सोहळ्यातील काही फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

अलिबाग येथील द मेन्शन हाऊस येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती हा लग्नसोहळा पार पडला. काही वेळापूर्वीच वरुण-नताशाच्या संगीत सोहळ्याचे फोटो समोर आले होते.त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यानंतर आता या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

वरुण आणि नताशा अखेर विवाहबंधनात; पहा विवाहसोहळ्याचे फोटो

अगदी मोजक्या पाहुण्यांनाच या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. या लग्नसोहळ्यात केवळ ५० जणांनाच आमंत्रण देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच सुरक्षेची अत्यंत कडेकोट व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

दरम्यान, या लग्नसोहळ्यात कलाविश्वातील दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कतरिना कैफ, कियारा आडवाणी, अनिल कपूर, जान्हवी कपूर असे अनेक दिग्गज सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 11:06 pm

Web Title: bollywood actor varun dhawan tie knot with natasha dalal ssj 93
Next Stories
1 ‘शुभमंगल ऑनलाईन’ने गाठला १०० भागांचा टप्पा!
2 ‘नव्या वर्षात माझं स्वप्न पूर्ण झालं’ ; सोनाक्षीने खरेदी केलं 4BHK अपार्टमेंट
3 just married! पाहा, मिस्टर & मिसेस चांदेकरांच्या लग्नाचे फोटो
Just Now!
X