31 October 2020

News Flash

‘टायगर कहा हैं’, आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीचा एकत्र डिनर

जुहूमधील एका हॉटेलच्या बाहेर या दोघांना स्पॉट करण्यात आलं आहे

शिवसेना नेते आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांच्या चर्चेत येण्यामागचं कारणंही तितकंच खास आहे. मुंबईतील एका हॉटेलबाहेर त्यांना पुन्हा एकदा अभिनेत्री दिशा पटानीसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘बागी २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या दिशासोबत यापूर्वीदेखील आदित्य ठाकरे एका डिनरसाठी गेले होते. त्यावेळी त्यांची प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा या दोघांना एकत्र पाहण्यात आलं असून त्यांच्या मैत्रीची चर्चा रंगली आहे.

जुहूमधील एका हॉटेलच्या बाहेर या दोघांना स्पॉट करण्यात आलं असून त्याचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र त्यांचा हा फोटो पाहून अनेकांनी दिशाला ट्रोल केलं आहे.

 

View this post on Instagram

 

#dishapatani with #adityathackeray snapped for dinner in juhu #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

‘टायगर जिंदा है’ असं एका युजरने म्हटलं आहे. तर काहींनी ‘टायगर कहां है’, असा प्रश्न विचारला आहे. तर ‘अब टायगर का क्या होगा, ‘अब फिर एक बार टाइगर के पैर में चोट लगने वाली है,’ असं म्हणतं अनेकांनी दिशाला ट्रोल केलं आहे.

‘धोनी’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली दिशा कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असते. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबतच्या रिलेशनमुळे ती कायमच चर्चेत असते. अनेक वेळा टायगर आणि दिशाला लंच डेट किंवा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं आहे.मात्र या दोघांनी कधीही त्यांचं नात सर्वासमक्ष मान्य केलं नाही. त्यानंतर आता दिशा आणि आदित्य ठाकरे यांच्या डिनरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र दिशाला आदित्य ठाकरेंसोबत पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, दिशाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ या चित्रपटामध्ये झळकली होती. या चित्रपटामध्ये तिने एक महत्वाची व्यक्तीरेखा साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 5:34 pm

Web Title: bollywood actress disha patani spotted on a dinner outing with aditya thackeray useres started trolling ssj 93
Next Stories
1 थरकाप उडवायला येतोय विकी कौशलचा ‘भूत’
2 सुभाष घई ‘राम-लखन’ला पुन्हा आणणार एकत्र ?
3 दाक्षिणात्य सिनेमांतील ‘कॉमेडी किंग’ काळाच्या पडद्याआड
Just Now!
X