News Flash

आईच्या पावलांवर पाऊल, तैमूरचा योगा पाहून करीना म्हणाली…

करीना तैमूरचा लॉकडाउन योगा

(photo-instagram@kareenakapoorkhan)

दुसऱ्यांदा आई झाल्यानंतरही करीना कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. रोज वेगवेगळ्या पोस्ट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. करीना कपूर कायम फिटनेसकडे लक्ष देताना दिसते. गरोदरपणातही करीना योगा आणि वर्कआउट करत होती. तर दुसऱ्यांदा बाळ झाल्यानंतर आता काही दिवस लोटले असल्याने करीना पुन्हा एकदा योग करू लागली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने योगा करतानाचे फोटो शेअर केले होते.

यावेळी मात्र करीनाने तैमूरचा एका फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअक केला आहे. या फोटोत तैमूर योगा मॅटवर झोपल्याचं दिसतंय. त्यामुळे तैमूरदेखील आता आईच्या पावलांवर पाऊल टाकत योगा करतोय असा असं वाटू लागलं आहे. या फोटोला करीनाने एक मजेशीर कॅप्शन दिलंय. ” योगानंतरची स्ट्रेचिंग की झोपेनंतरची स्ट्रेचिंग करतोय.. काही कळत नाहीय.” असं कॅप्शन देत तिने या फोटोला लॉकडाउन योगा असं हॅशटॅग दिलं आहे.

तैमूरचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्यामुळे त्याचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत असतात. करीनाने तैमूरचा हा फोटो पोस्ट करताच तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याचसोबत तैमूरचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो करीना बऱ्याचदा सोशल मीडियावर शेअर करत असते.

करीना तैमूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असली तरी तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती करीनाच्या दुसऱ्या मुलाबद्दल जाणून घेण्याची.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 3:27 pm

Web Title: bollywood kareena kapoor share taimur photo doing yoga on yoga mat while stretching kpw 89
Next Stories
1 पुरस्कार सोहळ्यात तापसीने केली कंगनाची स्तुती, कंगना म्हणाली…
2 कविता कौशिक ‘बिग बॉस’ला म्हणाली ‘फेक रिअ‍ॅलिटी शो’; “शोमुळे माझी..
3 सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला धक्का , नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Just Now!
X