28 February 2021

News Flash

पनवेलच्या फार्महाऊसवर सलमान लुटतोय पावसाचा आनंद; पाहा व्हिडीओ

पावसात भिजण्यात सलमान झाला दंग

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हिट अँड रन केस आणि काळवीट शिकार प्रकरण या दोन्हीमुळे चर्चेत होता. त्यासाठी त्याला तुरुंगात देखील जावे लागले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरुन मोठा वाद सुरु झाला आहे. यात अभिनेता सलमान खान याच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सलमान सतत चर्चेत येत होता. परंतु, सध्या तो अन्य एका कारणासाठी चर्चेत आला आहे. सध्या सलमान पनवेलमध्ये राहून पावसाचा आनंद लुटत असल्याचं पाहायला मिळत आहे.

लॉकडाउनचा कालावधी सुरु झाल्यापासून सलमान त्याच्या कुटुंबीयांसह पनवेल येथील फार्महाऊसमध्ये अडकला आहे. त्यातच आता पाऊस पडायला सुरुवात झाली असून सलमान पावसाचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच्या बॉडीगार्डने शेराने सलमानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Following the Legend…….. My Maalik @Beingsalmankhan #Salmankhan #Legend #Sheraa #Beingsheraa

A post shared by Being Sheraa (@beingshera) on


शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सलमान मस्त टेकड्यांवर फिरताना दिसत आहे. पाऊस पडून गेल्यामुळे इथल्या वातावरणात गारवा आला असून सर्वत्र हिरवळ पसरली आहे.

दरम्यान, सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. सलमान लवकरच आगामी राधे या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दिशा पटानी स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. परंतु, लॉकडाउनचा कालावधी सुरु असल्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:45 pm

Web Title: bollywood salman khan bodyguard shera shares video of panvel farmhouse monsoon ssj 93
टॅग : Salman Khan
Next Stories
1 सुशांत आत्महत्या प्रकरण : सेलिब्रिटी मॅनेजर रेश्मा शेट्टीची पाच तास चौकशी
2 शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट! स्टँडअप कॉमेडियननंतर मराठी अभिनेत्रीने केला महाराजांचा एकेरी उल्लेख
3 बिग बींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा; मुलांसोबत फोटो शेअर करत म्हणतात…
Just Now!
X