कलाविश्वात अनेकदा सेलिब्रिटींच्या करिअरसोबत त्यांच्या पर्सनल लाइफचीदेखील चर्चा रंगत असते. मग यात बऱ्याचदा त्यांचे अफेअर्स, ब्रेकअप या साऱ्यांचीच चर्चा होतांना दिसते. या सगळ्यात सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्याविषयी. गेल्या कित्येक दिवसांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. त्यातच आता या दोघांना लंच डेटवर जातांना स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांची चर्चा रंगली आहे.
सध्या सोशल मीडियावर कियारा आणि सिद्धार्थचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कियारा आणि सिद्धार्थ मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर दिसून आले. विशेष म्हणजे ही जोडी लंच डेटला गेल्याचं सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram
यापूर्वी कियारा आणि सिद्धार्थला मालदीवमध्ये एकत्र पाहण्यात आलं होतं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ही जोडी मालदीवला गेली होती. यावेळचे काही फोटोदेखील दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हापासून या दोघांच्या रिलेशनशीपची चर्चा सुरु आहे. मात्र, अद्यापतरी या दोघांनी याविषयी मौन बाळगलं आहे.
आणखी वाचा- वरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली ‘ही’ गोष्ट
दरम्यान, शेरशाह या चित्रपटात सिद्धार्थ- कियारा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारणार आहे. तर कियारा डिंपल चीमा ही भूमिका साकारणार आहे.