News Flash

‘मला माझं स्वातंत्र्य परत पाहिजे..’,वडिलांविरुद्ध ‘या’ गायिकेने ठोठावले न्यायालयाचे दरवाजे

ब्रिटनीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर 'FreeBritney' नावाने कॅम्पेन सुरु केले आहे.

ब्रिटनी बुधवारी लॉस एंजेलिस कोर्टात व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित होती.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स आणि तिचे वडील जेमी स्पीयर्स यांच्यात पालकत्वावरून वाद सुरु आहेत. बुधवारी ब्रिटनीने न्यायालयात या संदर्भात आपली याचिका दाखल केली आहे. ब्रिटनीला तिचे स्वातंत्र्य परत हवे आहे असे ती त्या याचिकेत म्हणाली आहे.

ब्रिटनी बुधवारी लॉस एंजेलिस कोर्टात व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित होती. सुमारे २० मिनिटे तिने तिची व्यथा सांगितली आणि तिने तिचे स्वातंत्र्य मागितले आहे. “मला स्वातंत्र्य परत पाहिजे, मला माझं आयुष्य परत पाहिजे. आता या गोष्टीला १३ वर्षे झाली आणि आता अनेक गोष्टी झाल्या आहेत,” असे ब्रिटनी म्हणाली. ब्रिटनीच्या वडिलांचा २००८ पासून तिच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि पैशावरही कायदेशीर अधिकार आहे. ब्रिटनी या सगळ्या गोष्टी सांगत असताना तिचे चाहते न्यायालयाच्या बाहेर तिच्या समर्थनार्थ आले होते. तर सोशल मीडियावर ट्वीट करत अनेकांनी तिच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘FreeBritney’ नावाने कॅम्पेन सुरु केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Britney Spears (@britneyspears)

ब्रिटनी ३९ वर्षांची आहे. तिचे वडील जेमी स्पीयर्स तिच्या पर्सनल लाइफ संबंधित सगळे निर्णय घेतात. या आधी ब्रिटनी मारहाण केल्याने, मानसिक आरोग्य ठीक नसल्याने आणि मादक पदार्थांचे सेवन केल्यामुळे चर्चेत आली होती, अशा परिस्थितीत तिचे वडील जॅमी यांना २००८मध्ये ब्रिटनीला Conservator म्हणजेच तिला सांभाळणारे म्हणून नियुक्त केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Britney Spears (@britneyspears)

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनीने २०१४ मध्ये तिच्या वडिलांचा तिच्या आयुष्यात असणाऱ्या हस्तक्षेपावर आक्षेप घेतला. तिच्या वडिलांवर असलेल्या इतर आरोपांसोबतच त्यांना दारुचं व्यसन असल्याचा आरोपही तिने केला आहे. गेल्या वर्षी ब्रिटनीच्या वकीलांनी कोर्टात सांगितले की ब्रिटनीला तिच्या वडिलांची भीती वाटत होती. ब्रिटनी सुमारे ४४५ कोटी रुपयांची मालक आहे आणि तिचे वडील या पैशाचे आणि तिचे गार्डियन आहेत.

आणखी वाचा : केआरकेला झटका, कोर्टाने सलमानवर कमेंट आणि व्हिडीओ करण्यापासून रोखले

कोर्टात बोलताना ब्रिटनी म्हणाली, “मी आनंदी नाही. मी झोपू शकत नाही. मी खूप रागात आहे. हे अमानुष आहे. मी दररोज रडते. मला बदल हवा आहे.”

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

या आधी ब्रिटनीने गेल्या वर्षी तिच्या वडिलांचे पालकत्व हक्क काढून टाकण्यासाठी आणि एका संस्थेला तिचा मालमत्ता हक्क देण्यासाठी याचिका दाखल केली होती. तिच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की ब्रिटनी तिच्या वडिलांना “घाबरत” होती. ब्रिटनीचे वडील जेमी २०१६ पासून तिचा मानसिक छळ करत आहेत. हे पालकत्व अत्याचारी आहे आणि ब्रिटनीला आता हे सहन होत नाही. तिच्या वडिलांच्या सांगण्याने ब्रिटनीने तीन नवीन अल्बम केले. अनेक टीव्ही शोमध्येही ती दिसली. त्यांनी लास वेगासमध्ये नवीन घरही विकत घेतले. परंतु जानेवारी २०१९ मध्ये, ब्रिटनीने अचानक घोषणा केली की पुढील सूचना येईपर्यंत तिचे सगळे परफॉमन्स रद्द झाले आहेत.

आणखी वाचा : राज- शिल्पाचा अनोखा टायटॅनिक व्हिडीओ

सन २०१९ मध्ये ब्रिटनीने आरोप केला की तिचे वडील आणि त्यांचे सहकारी तिला सतत धमकावत आहेत. ब्रिटनी म्हणाली, ‘ते म्हणतात की त्यांना पाहिजे तसं मी करत रहायला हवं, जर मी ते केलं नाही तर ते मला त्याबद्दल शिक्षा देतील. माझे डॉक्टर मला जबरदस्तीने औषधेही देत ​​आहेत. यामुळे मला नेहमीच एखाद्या व्यसनी माणसासारखे वाटते. मला स्वतःला एकट्यात कपडे बदलण्याची आणि गाडी चालवण्याची परवानगी नाही. आता पुरे झाले, मला माझे स्वातंत्र्य परत हवे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 2:50 pm

Web Title: britney spears goes emotional in courtroom urges judge to end guardianship of father and said i just want my life back dcp 98
Next Stories
1 ‘स्प्लिट्सविला’ आणि ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री ईशा आनंद शर्माने केलं सिक्रेट मॅरेज
2 ‘थ्री इडियट्स’ सिनेमानंतर नैराश्यात गेला होता अभिनेता अली फजल; ११ वर्षांनंतर सांगितलं कारण
3 ‘रात्री डिनरसाठी बोलवायचे…’, मिनिषा लांबाने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव
Just Now!
X