News Flash

Rare Moment : जेव्हा साऊथचे त्रिमुर्ती एकत्र येतात..

साऊथच्या या तीन सुपरस्टार्सना एकाच फ्रेममध्ये पाहणं चाहत्यांसाठी पर्वणीच असते.

रामचरण, ज्युनिअर एनटीआर, महेश बाबू

बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटांचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. अॅक्शन आणि मसालेदार कथा असलेले दाक्षिणात्य चित्रपट डब झाल्यानंतरही टीव्हीवर विशेष गाजतात. महेश बाबू, रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांसारख्या साऊथ सुपरस्टार्सचे चाहतेसुद्धा असंख्य आहेत. साऊथच्या या तीन सुपरस्टार्सना एकाच फ्रेममध्ये पाहणं चाहत्यांसाठी पर्वणीच असते. अशातच सोशल मीडियावर या तिघांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

रामचरण, ज्यु. एनटीआर आणि महेश बाबूचा हा ‘कॅन्डीड मूमेंट’ चाहत्यांना फारच आवडला आहे. ऑनस्क्रीन या तिघांमध्ये जरी स्पर्धा असली तरी यांच्या ऑफस्क्रीन मैत्रीवर त्याचा कोणताच परिणाम झालेला दिसून येत नाही. या फोटोमध्ये तिघंही मुक्तपणे हसताना पाहायला मिळत आहेत.

वाचा : ‘वीरे दी वेडिंग’सारखा चित्रपट मी पुन्हा कधीच करणार नाही- स्वरा भास्कर

महेश बाबूचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘भारत अने नेनू’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तगडी कमाई केली. याच चित्रपटाचे निर्माते धनय्या यांनी आगामी ज्यु. एनटीआर आणि रामचरण यांच्या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 12:30 pm

Web Title: camaraderie between jr ntr ram charan and mahesh babu is a treat for the fans see pic
Next Stories
1 ‘या’ पाच चेहऱ्यांना सलमानमुळे मिळाली ओळख
2 विराटबद्दल हे काय बोलून गेली करिना…? अनुष्का, ऐकतेयस ना गं?
3 ‘वीरे दी वेडिंग’सारखा चित्रपट मी पुन्हा कधीच करणार नाही- स्वरा भास्कर
Just Now!
X