News Flash

शुभ्राच्या आयुष्यात येणार एक नवी व्यक्ती

जाणून घ्या कोण आहे ही नवी व्यक्ती..

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘अग्गबाई सूनबाई’. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत शुभ्राचं रूप खूप वेगळं आहे. ही शुभ्रा थोडी बुजरी आहे. ती एका मुलाची आई आहे, तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर की नाही हा भाव तिच्या मनात सतत असतो.

या मालिकेत आसावरीने घराची सूत्र हाती घेतली आहेत. सोहम तिचा राईट हॅन्ड आहे, अभिजीत राजेंनी घरची जबाबदारी स्वीकारली आहे. दोघांमध्ये बाबा आणि मुलीचं नातं आहे. बबडूची (मुलाची) पूर्ण जबाबदारी असल्याने ती घरातच आहे. ती अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे, शुभ्रा अशी आहे कारण मुलाच्या म्हणजेच बबडूच्या जन्माच्यावेळेस निर्माण झालेली गुंतागुंत आणि सोहम सोबत संसार टिकवण्यासाठी सुरु असलेली तिची धडपड.

लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सोहम आणि सुझेनचं प्रेमप्रकरण शुभ्रा समोर आलं. प्रकरणाचा शुभ्राला मोठा धक्का बसल्याने ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. त्याचवेळेस तिच्यासमोर अनुराग गोखले नावाची व्यक्ती येते, कोण आहे हा अनुराग? असा प्रश्न प्रेक्षकांच्या समोर आहे. आता लवकरच प्रेक्षकांना त्याच उत्तर मिळणार आहे.

या मालिकेत अनुरागच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय उदगीरकर दिसणार आहे. चिन्मय पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या आधी चिन्मयने नांदा सौख्य भरे या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 6:56 pm

Web Title: chinmay udgirkar set to feature in aggabai sunbai soon know everything dcp 98
Next Stories
1 “सगळं काही सुरळीत होईल…!”; ‘फिट अँड फाईन’ अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा विश्वास
2 आधी स्कॅम आता जुगार, प्रतीक गांधीच्या नवीन वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
3 “..म्हणून आई पूनम ढिल्लोंच्या रोमॅंटीक फिल्म नाही बघत !” ; मुलगा अनमोल ढिल्लोंने सांगितलं हे कारण
Just Now!
X