16 December 2019

News Flash

`क्लासमेट’मध्ये तरुणाईचा जल्लोष

तरुणाई म्हटले की जल्लोष हा आलाच. तरुणाई हाच जोश, हाच उन्माद `क्लासमेट’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

| April 29, 2014 12:24 pm

तरुणाई म्हटले की जल्लोष हा आलाच. तरुणाई हाच जोश, हाच उन्माद `क्लासमेट’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. आदित्य सरपोतदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. `क्लासमेट’ या चित्रपटात प्रेम, मैत्री, जल्लोष, थरार संगीत असा संगम पाहायला मिळणार आहे. तरुणाईचा चित्रपट असला तरी तो वेगळय़ा धाटणीचा असणार आहे.
या चित्रपटाचा मुहूर्त गाण्याच्या चित्रीकरणाने संपन्न झाला असून नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या बेला शेंडे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. या भावस्पर्शी गाण्याचे बोल सिद्धहस्त गीतकार गुरू ठाकुर यांचे असून युवा संगीतकार अमित राज यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. `याद तुझी साद तुझी दरवळती श्वास तुझे जरा येऊनी या मनाला सावर रे असे बोल’ असलेल्या या गाण्यातून प्रेम भावना व्यक्त झाली आहे. मराठीतले तीन आघाडीचे संगीतकार या चित्रपटाला लाभले आहेत. अविनाश-विश्वजीत, पंकज पडघन, अमित राज यांच्या जोडीला आरिफ-ट्रॉय ही बॉलीवूडमधील युवा संगीतकार जोडी प्रथमच मराठी चित्रपटासाठी संगीत देणार आहे. तरुणाई आणि संगीत यांचे अतूट बंधन आहे. त्यामुळेच चित्रपटातील गाणी तरुणाईला भावतील अशा रितीने केली आहेत. १९९४ चा कालावधी या चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपटाचे संगीत, वेशभूषा या सगळय़ाबाबतीत एक वेगळेपण चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. आजचे आघाडीचे तरुण कलाकार या युथफूल चित्रपटातून ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एस. के. प्रोडक्शनचे संदीप केवलानी, व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई आणि सुरेश पै यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सोनाली कुलकर्णी, सचित पाटील यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

First Published on April 29, 2014 12:24 pm

Web Title: classmate marathi movie muhurt
Just Now!
X