News Flash

श्वेताची देवदत्तसोबत कॉफी डेट

धमाल मनोरंजन करणारी हटके लव्हस्टोरी

देवदत्त नागे, श्वेता शिंदे

डॉक्टर डॉन ही मालिका नुकतीच झी युवा वाहिनीवर सुरु झाली. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री श्वेता शिंदे यांची मेडिकल कॉलेजच्या पार्श्वभूमीवरील प्रत्येकाला वेड लावणारी आणि धमाल मनोरंजन करणारी हटके लव्हस्टोरी यामध्ये दाखवण्यात येत आहे.

देवदत्त आणि श्वेता म्हणजेच डॉन देवा आणि डीन मोनिका यांची अपघाती भेट, त्यानंतर सलूनमध्ये अचानक त्यांचं समोरासमोर येणं, देवाचं मोनिकाच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणं आणि दोघांची प्रत्येकवेळी होणारी शाब्दिक चकमक यामुळे कथानकात गमतीशीर वळणं येत आहेत. प्रेमाची ही वळणे नक्की फ्री वे कशी पकडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना झाली आहे. पण ही प्रेम सुरु होण्याआधीची मजा प्रत्येक प्रेमीयुगूलांनी अनुभवली असतीलच. म्हणजे प्रेमात भांडण नसेल तर प्रेम कसले?

आणखी वाचा : ‘ही लोकं अक्कलशून्य माकडं आहेत’; तोतरेपणाची खिल्ली उडवणाऱ्यांवर हृतिक भडकला 

देवा मोनिकाला पाहताक्षणी प्रेमात पडला असला तरी अजूनही हे प्रेम पूर्णपणे परिपक्व नाही आणि मोनिकाला तर देवाचा रागच आहे. त्यामुळे यांची ही गोष्ट पुढे नेण्यासाठी आता मोनिकाची आई मध्यस्थी घेऊन लव्हगुरूची भूमिका पार पडणार आहे. आता त्यांनी देवा आणि मोनिकाच्या कॉफी डेटचा घाट घातला आहे. आता ही ‘कॉफी डेट विथ देवा’ या कथानकाला नक्की काय वळण देते हे पाहणं नक्कीच मजेशीर असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 4:13 pm

Web Title: coffee date with devdatta nage ssv 92
Next Stories
1 जयललिता यांचा भास व्हावा असा कंगनाचा लूक
2 ‘या’ कारणामुळे होतेय दिशा- आदित्यची चर्चा
3 ‘ही लोकं अक्कलशून्य माकडं आहेत’; तोतरेपणाची खिल्ली उडवणाऱ्यांवर हृतिक भडकला
Just Now!
X