News Flash

अनुप सोनी क्राइम पेट्रोल नंतर खऱ्या आयुष्यात करणार इन्व्हेस्टिगेशन

अनुप सोनी आता खऱ्या आयुष्यात देखील क्राइम सीनवर

photo-Anup soni Instagram

सोनी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘क्राइम पेट्रोल’. ‘क्राइम पेट्रोल’ म्हटलं की सूत्रसंचालक म्हणून अनुप सोनीच नाव हमखास समोर येते . अनुप सोनीने आजवर बऱ्याच चित्रपटात, मालिकेत, वेब सिरीजमध्ये काम केले आहे. मात्र  ‘क्राइम पेट्रोल’ या मालिकेमुळे तो आज घराघरात पोहचला आहे. त्याची कथा सांगण्याची पद्धत प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. अनुप सोनीने ही मालिका सोडली आहे. मात्र आता असे समजत आहे की त्याने खऱ्या आयुष्यात क्राइम सीनवर जाण्याच ठरवलं आहे. यासाठी त्याने एक कोर्स देखील केला आहे.

अनुप सोनीने लॉकडाउनचा पुरेपुर फायदा करून घेतला आहे. अनुपने आपल्या कोर्सची माहिती त्याच्या सोशल मीडियाद्वारे नेटकाऱ्यांना संगितली आहे. अनुप सोनीने आता आंतरराष्ट्रीय न्यायालयीन विज्ञान विभाग (आयएफएस) क्राइम सीन इन्व्हेस्टिगेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्याने याचे प्रमाणपत्र देखील त्याच्या फॅन्सशी शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Annup Sonii (@anupsoni3)

अनुप सोनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो सध्या बराच ट्रेंड होत आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की लाॅकडाऊनच्या दरम्यान या कोर्स मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. परत अभ्यास करणे त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. मात्र माझी निवड योग्य होती आणि मला त्याचा अभिमान आहे,असे त्याने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Annup Sonii (@anupsoni3)

अनुप सोनीने हे प्रमाणपत्र शेअर करताच ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनुपच्या या पोस्टवर लाखो लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. कलाक्षेत्रातील बऱ्याच लोकांनी देखील अनुप सोनीच्या या पदवीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान अनुप सोनी अॅमेझाॅन प्राइमच्या ‘तांडव’या वेबसिरिज मध्ये झळकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 12:01 pm

Web Title: crime petrol anchor anup soni shares certificate of his new degree post went viral aad 97
Next Stories
1 “लाज वाटली पाहिजे तुम्हाला…”; राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी प्रकरणात राखी सावंतची उडी
2 अश्लील व्हिडीओत किती कमाई होते माहित्येय? राज कुंद्राचं दिवसाचं उत्पन्न ऐकून व्हाल थक्क!
3 Raj Kundra Whatsapp Chat: पॉर्न व्हिडीओ बनवण्यासाठी राज कुंद्राकडे तयार होता ‘प्लॅन बी’
Just Now!
X