News Flash

#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा

सई ही महेश मांजरेकर यांची मुलगी असून चित्रपटात बापलेकीची जोडी पाहायला मिळणार आहे.

'दबंग ३'

अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून होती. अखेर तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. ‘दबंग ३’ या चित्रपटात ती भूमिका साकारत असून तिच्या भूमिकेवरुन नुकताच पडदा उचलण्यात आला आहे. सलमान खानने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सईच्या भूमिकेची ओळख करुन दिली आहे.

या व्हिडीओत चुलबूल पांडे सईच्या फोटोकडे पाहत म्हणतो, ‘ये है हमाई खुशी और इनकी खुशी के लिए हम किसीको भी दुखी कर सकते है.’ चित्रपटात सई चुलबूल पांडेच्या प्रेयसीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ‘दबंग ३’मध्ये महेश मांजरेकरसुद्धा पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत असून सईसोबत ते स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे बापलेकीची जोडी पडद्यावरही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

पाहा फोटो : महेश मांजरेकरांची मुलगी आहे सौंदर्यवती; ‘दबंग ३’मधून करणार पदार्पण

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवाने केलं असून ‘दबंग’ फ्रँचाइजीमधला हा तिसरा चित्रपट आहे. पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनव कश्यप तर दुसऱ्याचे अरबाज खानने केले होते. या तिसऱ्या भागात विनोद खन्ना यांच्या भूमिकेची जागा प्रमोद खन्ना घेणार आहेत.

सलमान, सोनाक्षी, सईसोबतच चित्रपटात अरबाज, महेश मांजरेकर, डिंपल कपाडिया, माही गिल आणि कन्नड स्टार सुदीप महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 4:24 pm

Web Title: dabangg 3 salman khan shares first look of saiee manjrekar ssv 92
Next Stories
1 Video : वर्षभरानंतर अंकुश चौधरी येतोय ‘ट्रिपल सीट’
2 …म्हणून सोनाली कुलकर्णी वर्षभर ब्युटी पार्लरमध्ये गेली नाही
3 ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’तील शलाका आठवते?, पाहा तिचे आताचे फोटो
Just Now!
X