News Flash

१८ क्रू मेंबर्स पाठोपाठ ‘डान्स दीवाने ३’च्या परिक्षकाला करोनाची लागण

माधुरी दीक्षित, तुषार कालिया आणि धर्मेश येलांडे या शोचे परिक्षक आहेत.

गेल्या वर्षभरापासून करोनाचे काळे ढग आपल्या डोक्यावरून गेले नाही आहेत. राज्यात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘डान्स दीवाने’चा परिक्षक धर्मेश येलांडेला करोनाची लागण झाली आहे. या आधी सेटवर १८ क्रू मेंबर्सना करोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, धर्मेश त्याच्या गोव्यातील घरी होम क्वारंटाईनमध्ये आहे. डान्स दीवानेच्या पुढच्या भागात धर्मेशच्या जागी कोरिओग्राफर पुनीत पाठक आणि शक्ती मोहन घेणार आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया हे देखील तेव्हा असतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by D (@dharmesh0011)


‘डान्स दीवाने’चे निर्माते अरविंद राव यांनी याची माहिती दिली आहे. “गेल्या आठवड्यात धर्मेश जेव्हा घराच्या नूतनीकरणासाठी गोव्याला गेला तेव्हा त्याची करोना चाचणी ही निगेटिव्ह आली होती. ५ एप्रिलला तो शूटसाठी इथे येणार होता. पण, शूटिंग सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाला करोना चाचणी घ्यायची होती. धर्मेशने गोव्यात आणखी एक चाचणी केली आणि त्याला करोनाची लक्षणे दिसू लागली होती. त्यांनी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली, म्हणून आम्ही पुढच्या भागासाठी शक्ती मोहन आणि पुनीत जे पाठक यांना आणण्याचे ठरविले. त्यांनी माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया यांच्यासह या कार्यक्रमाचे चित्रीकरण केले. ”

 

View this post on Instagram

 

A post shared by (@dharmesh0011)

‘डान्स दीवाने’ बर्‍याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शोच्या वीकेंड एपिसोडमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान, हेलन आणि आशा पारेख दिसल्या होत्या. त्यांनी माधुरीसोबत त्यांच्या लोकप्रिय गाण्यांवर डान्स केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 10:30 am

Web Title: dance deewane 3 judge dharmesh yelande tests covid19 positive dcp 98
Next Stories
1 “ये क्या हो रहा है भाई…”, अमिताभ बच्चन यांची गुगली, चाहते कोड्यात!
2 “अक्षय कुमारही गुपचूप फोन करतो”, कंगना रणौतचा ‘मूव्ही माफियां’वर पुन्हा निशाणा
3 …आणि निया शर्मा धपकन कोसळली! व्हिडिओ होतोय व्हायरल….
Just Now!
X