धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या डान्स अनेक चाहते आहेत. अभिनयासोबतच माधुरीने मनमोहक सौंदर्य आणि डान्सने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. सध्या माधुरी ‘डान्स दीवाने ३’ या शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. या मंचावर तिने स्पर्धकांना डान्सच्या टिप्स तसचं प्रोत्साहन देताना दिसते. ‘डान दीवाने ३’ च्या मंचावर कायमच अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. यंदाचा भाग हा गणपती स्पेशल असून या खास भागात अभिनेत्री यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिसने हजेरी लावली होती.

यामी आणि जॅकलीनने स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस चांगलेच एन्जॉय केले. तसचं गणपती विशेष भाग असल्याने या भागात तीनही अभिनेत्रींचा साडीमधील देसी अंदाज पाहायला मिळणार आहे. या खास भागासाठी माधुरीने पैठणी साडी नेसली होती तर जॅकलीन आणि यामीदेखील साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. या शूटिंगवेळीचा एक खास व्हिडीओ माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात ‘रेशमाच्या रेघांनी ….’या मराठी गाण्यावर माधुरी दीक्षितसह यामी गौतम आणि जॅकलीनने ठेका धरत डान्स केल्याचं पाहायला मिळतंय.

Video: सोनाली कुलकर्णीने भावासोबत घरच्या घरीच साकारली गणरायाची मनमोहक मूर्ती

पहा फोटो: ‘टप्पू जोमात जेठालाल कोमात’; बबीताजी आणि टप्पूच्या रिलेशनशिपच्या चर्चांनंतर जेठालालचे मीम्स व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ शेअर करत माधुरीने “रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी…कर्नाटकी कशिदा मी काढिला” या गाण्याच्या ओळी कॅप्शनमध्ये लिहिल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांसह अनेक कलाकारांनी या व्हिडीओला पसंती दिली आहे.

‘डान्स दिवाने ३’ शोच्या गणपती विशेष भागात मंचावर गणरायाचं आगमन होणार आहे. तसचं स्पर्धकांचे खास परफॉर्मन्सेस देखील पाहायला मिळणार आहेत.