News Flash

दंगल गर्ल फातिमाचा दमदार डान्स; व्हिडीओ पाहून अनिल कपूर म्हणाले..

सोशल मीडियावर होतेय व्हायरल

सोशल मीडियावर कोणतही नवं चॅलेंज आलं कि अनेक सेलिब्रिटींना त्यात सामील होण्याचा मोह आवरता येत नाही. सध्या असंच एक चॅलेंज सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. डोन्ट रश (#Dontrushchallenge) या चॅलेंजची सध्या सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळतेय.

विकी कौशल आणि साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथानंतर आता दंगल गर्ल फातिमाने देखील या चॅलेंजमध्ये भाग घेतलाय. फातिमा सना शेख हिने नुकताच तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हे चॅलेंज स्विकारत एक व्हिडीओ पोस्ट केलाय. “शाजिब शेख सोबत थोडी मस्ती .. डोन्ट रश आमच्या स्टाइलमध्ये” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलंय.

फातिमाने तिच्या कोरिओग्राफरसोबत जबरदस्त डान्स केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय. डान्स करत असतानाच दोघही धमाल करताना दिसताय. फातिमाच्या या व्हिडीओला अनिल कपूर यांनी ‘जलवा’ अशी कमेंट दिलीय. तर चाहत्यांनी देखील तिच्या डान्सला भरभरून लाईकस् दिले आहेत. फातिमा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.  फातिमा एक उत्तम अभिनेत्री आहे मात्र ती एक उत्तम डान्स असल्याचं या व्हिडीओवरुन लक्षात येतंय.

2016 सालात आलेल्या ‘दंगल’ सिनेमातून फातिमाने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. त्यानंतर आमिर खान सोबत पुन्हा एकदा ती ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या सिनेमात झळकली. लवकरच ती नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या ‘अजीब दास्तान’ या सिनेमात झळकणार आहे. तर ‘अरुवी’ या सुपर हिट ठरलेल्या तामिळ सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमध्ये फातिमा झळकरणार आहे. सोशल मीडियावरुन तिने चाहत्यांना ही बातमी दिलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 12:23 pm

Web Title: dangal girl fatima sana sheikh shares video of dontrushchallenge dance kpw 89
Next Stories
1 रील टू रियल हीरो, महेश बाबूमुळे गरीब मुलाला मिळाले जीवनदान
2 Video: फोटोग्राफरवर ओरडला तैमूर अन्…, करीना कपूर झाली रागाने लाल
3 आदित्यला मला चित्रपटात न घेण्याचा देण्यात आला होता सल्ला, राणीने केला खुलासा
Just Now!
X