भरपूर शोधानंतर ‘सुलतान’ या आगामी चित्रपटासाठी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अनुष्का शर्माची निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता अनुष्काने सलमानसोबत कामालादेखील सुरुवात केलीयं. पण चित्रपटाच्या सेटवर अनुष्काने चक्क दबंग सलमान खानच्या कानशिलात लगावल्याचे वृत्त आहे.
सुलतान या चित्रपटात सलमान आणि अनुष्का हे दोघेही कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता साहजिकच कुस्तीपटू दाखविले आहेत म्हणजे त्यात कुस्ती तर येणारच ना. अशाच एका दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान अनुष्काला सलमानच्या थोबाडीत मारायचे होते. विशेष म्हणजे सलमाननेही त्याची परवानगी दिली. अली अब्बास दिग्दर्शिन करत असलेल्या या चित्रपटातील हे महत्त्वाचे दृश्य असल्याचे सांगितले जात आहे.
सलमानने या चित्रपटासाठी त्याच्या शरीरयष्टीत विशेष बदल केले आहेत. यावर्षी ईदच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल.