बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या २४ तासांमध्ये साडेनऊ कोटी लोकांनी पाहिला असल्याचे समारे आले. तसेच चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. आता या चित्रपटातील गाणे यूट्यूबवर चाहत्यांच्या मागणीमुळे प्रदर्शित झाले असल्याचे समोर आले आहे.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार सुशांतच्या शेवटच्या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली होती. तसेच ही गाणी यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात यावी अशी मागणी चाहत्यांनी केली होती. म्हणून चाहत्यांच्या मागणीवरुन सोनी इंडियाने चित्रपटातील ‘मसखरी (Maskhari Song)’ हे गाणे यूट्यूबर प्रदर्शित केले आहे. ‘मसखरी’ हे गाणे गायिका सुनिधि चौहान आणि हृदय गट्टाणी यांनी गायले आहे.

करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सिनेमागृह बंद आहेत. परिणामी ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुशांतसोबत नवोदित अभिनेत्री संजना सांघीने स्क्रीन शेअर केली असून तिचा अभिनयदेखील प्रेक्षकांना भावला आहे. १ तास ४१ मिनीटांच्या या चित्रपटाला जगातील सर्वात मोठी रेटिंग ऑथिरिटी आयएमडीबीनेदेखील १० पैकी १० रेटिंग दिले आहे.

सुशांतचा शेवटचा चित्रपट सर्वांना पाहता यावा यासाठी डिझनी प्लस हॉटस्टारने तो प्रीमिअम सबस्क्रीप्शन नसलेल्यांसाठीही मोफत ठेवला. तरीसुद्धा टोरंट साइट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे. प्रदर्शनाच्या काही तासांनंतर लगेचच ‘दिल बेचारा’ तमिळ रॉकर्ससारख्या टोरंट वेबसाइट्सवर लीक करण्यात आला.