News Flash

नव-याचा अपमान करणा-याला अभिनेत्रीने खडसावले

विवेकने फक्त तिची प्रसिद्धी आणि तिच्या पैश्यांकडे पाहून लग्न केले आहे.

या दोघांमधील प्रेम त्यांच्या सोशल मिडियावरील पोस्टमधून दिसून येते.

टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही तिच्या नव-याप्रती बरीच जागरुक असते. तिचा पती विवेक दाहिया हा देखील टेलिव्हिजनवर कार्यरत आहे. या दोघांमधील प्रेम त्यांच्या सोशल मिडियावरील पोस्टमधून दिसून येते. त्याचप्रमाणे, दिव्यांकाचा रागही सोशल मिडीयावर दिसून येतो.

झालं असं की, दिव्यांकाच्या एका फॉलोअरने तिचा पती म्हणजेच विवेक याला लोभी असे म्हटले. इतकेच नव्हे तर विवेकने फक्त दिव्यांकाची प्रसिद्धी आणि तिच्या पैश्यांकडे पाहून लग्न केले आहे. दिव्यांकाची निवड चुकली आहे. दिव्यांकाने नेहमी तुझ्यावर प्रेम केले. पण तू तिच्यावर कधीच प्रेम केले नाहीस, असे फॉलोअरने म्हटले आहे. मात्र, आपल्या फॉलोअरचे हे कृत्य दिव्यांकाला आवडले नाही. तिने जवळपास ६०० कमेन्टमधून ही कमेन्ट शोधून काढली आणि त्यास प्रत्युत्तर दिले. दिव्यांकाने अतिशय खडतरं शब्दांमध्ये तिच्या चाहत्याला उत्तर दिले. त्यावर एका यूजरने दिव्यांकाला समजावले. पण याही फॉलोअरच्या समजवण्याची पद्धत दिव्यांकाला काही आवडली नाही. त्यालाही दिव्यांकाने तिच्या शैलीत उत्तर दिले.

भारतीय टेलिव्हिजन जगतात दिव्यांका ही सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे असेही म्हटले जात आहे. तीन वर्षांपूर्वी सुरु झालेली तिची ‘ये है मोहोब्बते’ ही मालिका आजही अनेकांची दाद मिळवत आहे. दिव्यांकाची लोकप्रियता ही फक्त तिच्या ‘इशिमा’च्या भूमिकेपुरतीच मर्यादित नसून तिच्या सोशल मीडियावरील पोस्टसाठीही ती नेहमीच चर्चेत असते.

divyanaka-1

v1

v2

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 3:52 pm

Web Title: divyanka tripathi gets into an ugly fight with a fan
Next Stories
1 बर्थडे स्पेशलः या उत्तरामुळे सुश्मिता झालेली मिस यूनिव्हर्स
2 VIDEO: म्हणून सुश्मिता आहे परफेक्ट मॉम
3 ‘मंजुळाबाई उसने परतफेड’ बँकेवर उमटले नोटाबंदीचे पडसाद