लॉकडाउनच्या काळात लोकांच्या मनोरंजनासाठी ‘रामायण’ आणि त्या पाठोपाठ ‘उत्तर रामायण’ या मालिका पुन्हा प्रदर्शित करण्यात आल्या. आता रामानंद सागर यांच्या या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. रामायण ही मालिका ऑन-एअर होताच या मालिकेने टीआरपीचे सारे विक्रम मोडीत काढले होते. पण रामायण मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर ‘उत्तर रामायण’ ही मालिका पुन्हा प्रदर्शित करण्यात आली. या मालिकेने देखील टीआरपी यादीमध्ये पहिले स्थान मिळवले आहे.

Broadcast Audience Research Council-Nielsen ने २५ एप्रिल ते १ मेपर्यंतची यादी जाहिर केली आहे. या प्रसिद्ध केलेल्या ताज्या यादीनुसार डीडी नॅशनलवरील ‘उत्तर रामायण’ ही मालिका सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ठरली आहे. तर ‘महाभारत’ ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच दंगल वाहिनीवरील ‘बाबा ऐसा वर ढूंढो’ ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ‘महिमा शनिदेव की’ चौथ्या क्रमांकावर आहे.

सतराव्या आठवड्यातील टॉप पाच मालिका:

1. उत्तर रामायण- डीडी नॅशनल
2. महाभारत- डीडी भारती
3. बाबा ऐसो वर ढूंढो- दंगल टीव्ही
4. महिमा शनिदेव की- दंगल टीव्ही
5. रामायण- दंगल टीव्ही

यापूर्वी ही दूरदर्शन वाहिनीने २८ मार्च ते ३ एप्रिल या आठवड्यात दमदार पराक्रम करून दाखवला होता. डीडी नॅशनल वाहिनीचा प्रेक्षकवर्ग १३ व्या आठवड्यात (२८ मार्च ते ३ एप्रिल) सकाळी ९ ते १०.३० या कालावधीत ५८० मिलियन एवढा झाला होता. याशिवाय १३ व्या आठवड्यातील करस्पॉडिंग प्रेक्षकवर्गदेखील ८३५ मिलियन एवढा दिसून आला. १२ व्या आठवड्यात तो केवळ २ मिलियन इतकाच होता.