30 November 2020

News Flash

Bigg Boss च्या घरात होणार एकता कपूरची एंट्री; मिर्झापूरचा मुन्ना भैय्याही सोबत दिसणार

पाहा का होणार त्यांची एंट्री

कलर्स वाहिनीवर सुरू असलेला बिग बॉस हा कार्यक्रम कायमच चर्चेचा विषय असतो. शो स्टार्ससाठी बिग बॉस हा प्रमोशनचा आवडता स्पॉट मानला जातो. आता टीव्ही क्वीन म्हणून ओळख असलेली एकता कपूर बिग बॉसमध्ये दिसणार आहे. यामागचं कारणंही वेगळं आहे. ती एक स्पर्धक म्हणून नाही तर आपल्या आगामी ‘बिच्छु का खेल’ या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये जाणार आहे. एकता कपूरसोबत मिर्झापूरचा मुन्ना भैय्याही बिग बॉसच्या सेटवर दिसणार आहे. पिंकविलानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात एकता कपूर आणि दिव्येंदू वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसणार आहेत. यापूर्वीही एकता कपूर बिग बॉसमध्ये आली होती. परंतु आता ती बिग बॉसच्या घरात एंट्री मारणार आहे. दरम्यान, बिग बॉसचे स्पर्धकही यासाठी आतुर आहेत. फराह खान प्रमाणे तीदेखील स्पर्धकांना काही टास्क देणार का? हे येत्या काही दिवसांमध्ये समजेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Erk rek (@ektarkapoor)

१८ नोव्हेंबर रोजी अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज प्रदर्शित करण्यात आली आहे. परंतु आता या सीरिजच्या प्रमोशनसाठी एकता कपूर सलमानच्या या शोमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये दिव्येंदूव्यतिरिक्त अंशुल चौहान, झिशान काद्री, राजेश शर्मा, सत्यजित शर्मा, गगन आनंद आणि अभिनव आनंद हे दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 1:42 pm

Web Title: ekta kapoor all set to visit bigg boss 14 house for the first time with divyenndu alt balaji web series salman khan hosted show jud 87
Next Stories
1 अभिनेता निखिल द्विवेदीला झाली करोनाची लागण
2 ‘आता फक्त एल्गार !’; राजन पाटील यांची पोस्ट चर्चेत
3 ‘माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे’; अभिनेता राजन पाटील यांची भावनिक पोस्ट
Just Now!
X