News Flash

हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर एली म्हणते..

हार्दिक पांड्या आणि एली अवराम यांच्या 'सिक्रेट डेटिंग'बद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर एली म्हणते..
हार्दिक पांड्या, एली अवराम

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री एली अवराम यांच्या ‘सिक्रेट डेटिंग’बद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. गेल्यावर्षी हार्दिकचा भाऊ कृणालचे लग्न झाले. त्यावेळी एलीने आवर्जून लग्नात उपस्थिती लावली होती. तेव्हापासूनच या दोघांमध्ये नाते असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. त्यात क्रिकेटपटूंच्या पत्नींसोबत एलीच्या फोटोने तर या चर्चांना आणखीनच उधाण आले. यामुळे आपल्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी कल्पना दिली असावी असेही म्हटले गेले. पण, एलीने नुकतीच दिलेली प्रतिक्रिया पाहता तिला या नात्याची माहिती जगापर्यंत पोहचू द्यायची इच्छा नसल्याचे दिसते.

वाचा : शाहिदबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल रणवीरने व्यक्त केली दिलगिरी

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत एलीने हार्दिकला डेट करत असल्याचे नाकारले नाही पण तिने हे वृत्त खरे असल्याचेही म्हटले नाही. तिने यातून मधला मार्ग काढत म्हटले की, लोकांना काय विचार करायचा तो करू देत. मला स्पष्टीकरण देण्याची गरज काय? सध्याच्या चर्चांविषयी ती म्हणाली की, मी गॉसिपसाठी केवळ निमित्त देत आहे. असो, गेल्याकाही वर्षात कितीतरी चुकीच्या गोष्टी लिहिल्या गेल्या पण त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी मी पुढे आले नाही. एकदा का आपण स्पष्टीकरण दिले की लोक अधिकाधिक गॉसिप आणि बातम्यांसाठी तुमच्या मागे लागतात. या सगळ्यातून लांब राहण्यासाठी तुम्ही स्वतःला कोंडून घेऊ शकत नाही. अफवा थांबवण्यासाठी आपण फारकाही करू शकत नाही. त्यातही मी हार्दिकबद्दल काहीही बोलले तरी, ही खोटं बोलतेय. आम्हाला सर्व माहिती आहे, ती नक्कीच काहीतरी लपवत आहे, असे बोलण्याची लोकांची मानसिकता असते.

वाचा : माव्‍‌र्हलकडून ‘हल्क’ला नारळ

जोपर्यंत कुटुंबाला आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सत्य माहिती आहे तोपर्यंत आपल्याला कोणालाही उत्तर देण्याची गरज नाही असे एलीचे मत आहे. माझ्या कुटुंबासोबत माझी जवळीक आहे. माझ्या आयुष्यात जे काही सुरु आहे त्याची संपूर्ण माहिती त्यांना आहे. त्यामुळे मला कशाचीच चिंता नाही. उलट माझ्या बाबांनी मला या सगळ्याकडे दुर्लक्ष करायला शिकवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2018 10:36 am

Web Title: elli avram finally breaks her silence on dating hardik pandya says why do i need to clarify anything
Next Stories
1 जाणून घ्या नजरेने घायाळ करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल
2 TOP 10 NEWS : मार्व्हलच्या हल्कपासून रणवीरने व्यक्त केलेल्या दिलगीपर्यंत..
3 राजकारणात सक्रिय होणारे रजनीकांत ‘काला’ रुपात प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज
Just Now!
X