अनेक वर्ष चित्रपटांपासून लांब राहिलेली सौंदर्यवती ऐश्वर्या राय-बच्चन आता संजय गुप्ता यांच्या ‘जझबा’ चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे. मोठ्या पडद्यावरील तिच्या या पुनरागमनाने तिचा पती अभिषेक बच्चन कमालीचा खूष झाला आहे. २०१० सालच्या ‘गुझारिश’ चित्रपटात ऐश्वर्याचे शेवटचे दर्शन झाले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०११ मध्ये आराध्याचा जन्म झाला. आता इतकी वर्षे चित्रपटांपासून दूर राहिल्यावर ऐश्वर्या मोठ्या पडद्यावर आपली जादू झळकविण्यासाठी सिद्ध झाली आहे. तिच्या पुनरागमनाविषयी एका कार्यक्रमात बोलताना अभिषेक म्हणाला, ऐश्वर्याला ‘जझबा’ चित्रपटात काम करताना पाहण्यासाठी मी कमालीचा उत्सुक आहे. तिला चित्रपटात पुन्हा काम करताना पाहणे खूप गंमतीशीर असणार आहे. संजय गुप्ता दिग्दर्शक म्हणून मला खूप आवडतात. ऐश्वर्या आणि संजयने एकत्र काम करणे हा एक चांगला योगायोग आहे, असे मला वाटते… ऐश्वर्याला मोठ्या पडद्यावर पाहणे हे नेहमीच आनंददायी असते. ‘जझबा’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात इरफान खान आणि शबाना आझमी यांच्यादेखील भूमिका आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2015 रोजी प्रकाशित
ऐश्वर्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक – अभिषेक बच्चन
अनेक वर्ष चित्रपटांपासून लांब राहिलेली सौंदर्यवती ऐश्वर्या राय-बच्चन आता संजय गुप्ता यांच्या 'जझबा' चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे.

First published on: 07-01-2015 at 07:35 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excited to see aishwarya back on big screen abhishek bachchan