19 September 2020

News Flash

“…तर शाहरुखशी केलं असतं का लग्न?”; काजोलने दिले भन्नाट उत्तर

त्या वेळी या जोडीने अनेकांची मने जिंकली होती

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि अभिनेत्री काजोल यांची जोडी बॉलिवूडमधील हिट जोड्यांमधील एक आहे. या जोडीने एकेकाळी बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला होता. चाहत्यांना या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला आवडते.

काजोल सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी सतत संवाद साधत असते. नुकताच काजोलने इन्स्टाग्रामवरील प्रश्न आणि उत्तर या फिचरद्वारे चाहत्यांशी संवाद साधला आहे. दरम्यान एका चाहत्याने काजोलला जर तिच्या आयुष्यात अजय देवगण नसता तर तिने शाहरुख खानशी लग्न केले असते का? असा प्रश्न विचारला. त्यावर काजोलने दिलेले उत्तर वाचून तुम्हालाही हसू येईल. ‘पुरुषाने प्रपोज करायचं असतं ना’ असे उत्तर दिले आहे. त्यानंतर एका चाहत्याने शाहरुख आणि तू पुन्हा एकत्र कधी दिसणार असा प्रश्न देखील विचारला आहे. त्यावर काजोलने ‘शाहरुखलाच विचारा’ असे उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : ‘तान्हाजी’च्या ट्रेलर लाँचला काजोल आली नाही, कारण…

शाहरुख आणि काजोलने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘बाजीगर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’, ‘दिलवाले’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. तसेच या जोडीने त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने अनेकांची मने जिंकली होती. आता चाहते पुन्हा एकदा शाहरुख आणि काजोलला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

आणखी वाचा : रणवीरमुळे राणी मुखर्जी झाली ट्रोल, कारण…

सध्या काजोल तिचा आगामी चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार असून तो तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. तर काजोल तान्हाजी यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 11:07 am

Web Title: fan asks kajol if she would have married shah rukh khan had she not met ajay devgn avb 95
Next Stories
1 Video : अनुष्का कुत्र्याला चिडवताना अचानक घडला ‘हा’ प्रकार
2 ‘पानिपत’च्या कथेवर हक्क सांगत विश्वास पाटील यांचा सात कोटींचा दावा
3 “मेकअप करुन वय लपणार नाही”; नेटकऱ्यांनी केलं मलायकाला ट्रोल
Just Now!
X