माकड हे माणसाचे पूर्वज आहेत असे सांगितले जाते. मात्र वेद शास्त्रात असे कुठेही नाही. आम्ही आता आहोत तसेच होतो असे मत केंद्रीय मानव संसाधन मंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केले होते. या वक्तव्यावरून गेल्या काही दिवसांत बरेच वादविवाद आणि टीकाटिप्पणी झाल्या. सोशल मीडियावर उपरोधिक मीम्सदेखील व्हायरल झाले. या सर्वांमध्ये आता अभिनेता फरहान अख्तरने केलेले ट्विट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा असल्याचे वक्तव्य करणाऱ्या सत्यपाल सिंह यांना फरहानने ट्विटरच्या माध्यमातून उपरोधिक टोला लगावला. ‘ब्रेकिंग- डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताविरोधात आदिमानवांनी निषेध केला आहे. मानवाच्या उत्क्रांतीत आमचा काही सहभाग नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे,’ असे ट्विट फरहानने केले.
Breaking – Apes join protest against Darwin’s Origin of Species. They deny any involvement in the existence of certain homosapiens.
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) January 21, 2018
Our ancestors nowhere mentioned they saw ape turning into man. Darwin's theory (evolution of man) is scientifically wrong & needs to be changed in schools & colleges. Since the time man was seen on earth, he has been a man & will remain a man: Union Min Satyapal Singh (19.1.18) pic.twitter.com/7QthNeQt5B
— ANI (@ANI)
दरम्यान, सत्यपाल सिंह यांच्या विरोधात वैज्ञानिकांनी ऑनलाइन मोहीम शनिवारपासून सुरू केली आहे. वैज्ञानिकांनी सुरू केलेल्या या ऑनलाइन मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी हे भाषण मागे घ्यावे आणि उत्क्रांतीचा सिद्धांत शिकविण्याबाबत सरकारने कोणते धोरण आखले आहे, याबाबतही स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.