News Flash

“आमिर खानशी लग्न कधी करताय?”; प्रश्न विचारत नेटकऱ्याने फातिमा सना शेखला केलं ट्रोल

आमिरच्या घटस्फोटावेळी फातिमा ट्विटरवर ट्रेंड करत होती.

(photo-instagram-fatimasanashaikh)

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटाने चाहत्यांमध्ये एकच खळबळ माजली होती. आमिर आणि किरणच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर देखईल मीम्सचा पाऊस पाहायला मिळाला. अनेक नेटकऱ्यांनी यानंतर आमिरला ट्रोल केलं. आमिरच्या घटस्फोटाच्या प्रकरणात नेटकऱ्यांनी अभिनेत्री फातिमा सना शेखला देखील ओढलं. आमिर आणि सनाचं नात जोडतं सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर अजूनही अनेक नेटकरी फातिमाला आमिर खानवरून सवाल विचारत ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

फातिमा सना शेख सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ग्लॅमरल फोटो शेअर करत ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. मात्र फातिमाने नुकताच एका ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी फोटो शेअर केला असून नेटकऱ्यांनी तिला कमेंट करत ट्रोल केलंय. खास करून अनेक नेटकऱ्यांनी आमिर खानशी तिचं नाव जोडत फातिमाला ट्रोल केलंय.

हे देखील वाचा: ब्रा स्ट्रॅप दाखवल्याने ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्री ट्रोल, पतीने नेटकऱ्याला दिलं सडेतोड उत्तर

फातिमाच्या या फोटोवर एका नेटकऱ्यांने कमेंट केली, “आमिर खानशी लग्न कधी करताय मॅडम तुम्ही?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “काकांशी लग्न कधी करताय.” आणखी एक युजर फातिमाला म्हणाला, “आमिर खानसाठी तयार होतेयस”

fatima-sana-troll (photo-instagram-fatimasanashaikh)

आमिर खानच्या घटस्फोटानंतर देखील नेटकऱ्यांनी फातिमा सना शेखवर निशाणा साधला होता. दंगल सिनेमादरम्यान फातिमा आणि आमिरच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. या चर्चांवर फातिमा “या केवळ अफवा आहेत” असं म्हणत पूर्ण विराम दिला होता. मात्र आमिरच्या घटस्फोटानंतर पुन्हा एकदा आमिर आणि फातिमाचं नाव जोडलं लावू लागलं आहे. एवढचं नव्हे तर आमिरच्या घटस्फोटावेळी फातिमा ट्विटरवर ट्रेंड करत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 9:11 am

Web Title: fatima sana shaikh troll user asked when are u getting married with amir khan kpw 89
Next Stories
1 मंदिरा बेदीने फॅमिली फोटो शेअर करत सहकार्यासाठी लोकांचे मानले आभार
2 ‘द कपिल शर्मा शो’च्या टीमने घेतली करोना लस; सावधगिरीने केली सुरूवात
3 Bigg Boss OTT: सलमान खानने केली ‘बिग बॉस’ सीजन १५ ची घोषणा; टीव्हीवर नव्हे ओटीटीवर होणार रिलीज
Just Now!
X