22 September 2020

News Flash

धोनीवरील चित्रपटाचा फर्स्टलूक: सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत

भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावरीवल चित्रपटात 'काय पो छे' फेम सुशांत सिंग राजपूत मुख्यभुमिका साकारतोय.

| September 25, 2014 03:07 am

भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावरीवल चित्रपटात ‘काय पो छे’ फेम सुशांत सिंग राजपूत मुख्यभुमिका साकारतोय. या चित्रपटाला यापूर्वीच काही अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण, या सर्व अडथळ्यांवर मात करत अखेर या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला.
या चित्रपटाला हिरवा कंदील देण्यासाठी धोनीकडून प्रचंड मानधनाची अपेक्षा व्यक्त केली जात असल्याची चर्चा होती तर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही(बीसीसीआय) या चित्रपटाबाबत आक्षेप नोंदवला होता.
‘अ वेनस्डे’ आणि स्पेशल २६ चित्रपटांचे दिग्दर्शक निरज पांडे यांनी धोनीवरील या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, खेळाडूंच्या जीवनावर साकारलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘मेरी कोम’ चित्रपटांचे यश पाहता या चित्रपटालाही रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2014 3:07 am

Web Title: first look of ms dhoni biopic sushant singh rajput to play lead
Next Stories
1 शाहीद कपूरचा ‘कमिने २’ येणार..
2 चाहत्यांना लवकरच अबरामची छायाचित्रे पाहता येतील- शाहरूख खान
3 स्त्री अंगप्रदर्शन हे भारतीय चित्रपटाचे अंगच
Just Now!
X