News Flash

भाईजान भडकला! पहिल्यांदाच ट्रोलर्सना उत्तर देत म्हणाला…

सलमानने एका मुलाखतीत त्याच्या ट्रोल्सना उत्तर दिले आहे.

सलमानने एका मुलाखतीत त्याच्या ट्रोल्सना उत्तर दिले आहे.

अभिनेता आणि निर्माता अरबाझ खान हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अरबाझ त्याच्या चॅट शोमुळे चर्चेत आला आहे. अरबाझचा सेलिब्रिटी चॅट शो ‘पिंच २’चा सीझन घेऊन आला आहे. या शोचा प्रोमा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याच कारण म्हणजे बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने ट्रोल करणाऱ्यांना पहिल्यांदा उत्तर दिले आहे.

अरबाझने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला “जनतेचा देव बणण्याचा प्रयत्न करू नको…” अशी एक कमेन्ट अरबाज बाचतो. ही कमेन्ट ऐकून सलमान म्हणतो, “अगदी बरोबर देव एकचं आहे आणि मी देव नाही.” त्यानंतर सलमान एका कमेंटला उत्तर देताना बोलतो की, “माझ्या पोस्टमध्ये त्यांनी असं काय पाहिलं की त्यांना माझं घर अय्याशीचा अड्डा वाटू लागला आहे…, मला सांगायचं आहे की आधी स्वत:कडे बघा की तुम्ही काय करत आहात.” सलमान पहिल्यांदा ट्रोल करणाऱ्यांना काही बोलला आहे. या आधी सलमानने ट्रोल विषयी कधीच चर्चा केली नाही.

आणखी वाचा : ‘तुला हे करावं लागेल…’, ‘मोमो’ने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

आणखी वाचा : ‘तुला लाज वाटायला हवी, तू मुस्लीम आहेस’, कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने सारा झाली ट्रोल

या प्रोमोत सगळे कलाकार त्यांना ट्रोल करणाऱ्यांनी केलेल्या कमेंट वाचत त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया देतात. त्यानंतर फरहान अख्तर, अनिल कपूर, अनन्या पांडे, आयुषमान खुराना, कियारा आडवाणी, राजकुमार असे अनेक कलाकार दिसत आहेत. हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 7:09 pm

Web Title: first time salman khan gave replied to the trolls in arbaaz show dcp 98
Next Stories
1 अल्लू अर्जुनची ४ वर्षाची मुलगी समांथा अक्किनेनीसोबत झळकणार, साउथ सिनेमातून अभिनयात पदार्पण
2 “खऱ्या आयुष्यात बाळाला जन्म देण्याच्या विचारानेच…”, प्रसूतीच्या ‘त्या’ सीनवर क्रिती सेनॉन म्हणाली..
3 ए आर रहमान आणि अनन्या बिर्ला यांचे टोकियो ऑलिम्पिकसाठी ट्रिब्युट गाणे ‘हिंदुस्थानी वे’ झाले प्रदर्शित
Just Now!
X