माजी आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी चित्रपट निर्माता करण जोहर विरोधात ड्रग्स पार्टीचं आयोजन केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. करण जोहरने गेल्या वर्षी आपल्या घरात एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, विकी कौशल, मलायल अरोरा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करण्यात आलं होतं असा आरोप मनजिंदर सिंह यांनी केला आहे. या कलाकारांची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे गेल्या वर्षी या पार्टीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनजिंदर सिंह यांनी ट्विटरद्वारे या तक्रारीची माहिती देशवासीयांना दिली. “मी करण जोहर विरोधात ड्रग्स पार्टीचं आयोजन केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधील सर्व कलाकारांची चौकशी करावी अशी विनंती मी एनसीबीकडे केली आहे.” अशा आशयाचं ट्विट मनजिंदर सिंह यांनी केलं आहे. या ट्विटसोबत त्यांनी एनसीबीचे प्रमुख राकेश अस्थाना यांना लिहिलेल्या पत्राचे फोटो देखील पोस्ट केले आहेत. मनजिंदर सिंह यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.