28 February 2021

News Flash

Golmaal Again posters: रोहित शेट्टी घेऊन येतोय हॉरर आणि कॉमेडीचा तडका

‘गोलमाल अगेन’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होईल.

‘गोलमाल अगेन’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होईल.

शुक्रवारी म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या टीमने तीन पोस्टर्स प्रसिद्ध केले आहेत. हॉरर आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका असलेल्या या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, परिणीती चोप्रा, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे हे तीनही पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

‘इस दिवाली लॉजिक नही सिर्फ मॅजिक’ ही टॅगलाइन सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. रोहितने ‘गोलमालः फन अनलिमिटेड’ हा सिनेमा २००६ मध्ये केला होता. त्यानंतर २००८ मध्ये ‘गोलमाल रिटर्न्स’ आणि २०१० मध्ये ‘गोलमाल ३’ हे सिनेमे प्रदर्शित झाले होते. हे तीनही सिनेमे प्रेक्षकांना पसंत पडले होते. ‘परफेक्ट एन्टरटेन्मेंट पॅकेज’ म्हणून या चित्रपटांकडे पाहिलं जातं. त्यामुळे आता ‘गोलमाल अगेन’ प्रेक्षकांना खूश करायला यशस्वी ठरतो की नाही हे तर येणारा काळच ठरवेल.

‘रिलायन्स एण्टरटेनमेन्ट’, ‘मंगलमूर्ती फिल्म्स’ आणि ‘रोहित शेट्टी पिक्चर्स’ यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘गोलमाल अगेन’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 9:21 pm

Web Title: golmaal again posters released ajay devgn and team are ready with laughter package
Next Stories
1 ‘द कपिल शर्मा शो’ पाहायचा आहे, मग २०१८ ची वाट पाहा!
2 VIDEO : अचूक निशाणा साधणाऱ्या कतरिनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
3 राणी पद्मावतीला मल्लिका म्हटल्याने ट्रोल झाला रणवीर
Just Now!
X