21 October 2018

News Flash

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘हलाल’

‘हलाल’ चित्रपट तिसऱ्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये निवडला गेला.

‘हलाल’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून विशेष गाजत आहे.

‘हलाल’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून विशेष गाजत आहे. ‘धग’ सारखा वेगळा आशयघन चित्रपट दिग्दर्शित करणारे राष्ट्रीय पारितोषिक विजेते शिवाजी लोटन पाटील ह्यांनी राजन खान ह्यांच्या कथेवरून ‘हलाल’ चित्रपटाची कथा मोठया पडद्यावर मांडली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि आता तिसरा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अशा मानाच्या चित्रपट महोत्सवांवर यशाची मोहोर उमटवणाऱ्या ‘हलाल’ चित्रपटाकडून साऱ्यांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत.
अमोल कांगणे फिल्म्स निर्मित, शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘हलाल’ चित्रपट तिसऱ्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये निवडला गेला असून ३१ जानेवारीला औरंगाबाद मधील आयनॉक्स चित्रपटगृहात सायं. ७.३० वा. ‘हलाल’ दाखवण्यात येणार आहे. या आधी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक विभागात निवडलेल्या ‘हलाल’ सिनेमासाठी निशांत धापसे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा व संवादासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. हलाल’ चित्रपटात मुख्य भूमिकेत चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे आणि प्रियदर्शन जाधव असून विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर या कलाकारांच्या भूमिका पहायला मिळणार आहेत.
लेखक राजन खान यांच्या ‘हलाल’ या कांदबरीवर आधारित हा सिनेमा मुस्लीम धर्मातील विवाहसंस्थेवर भाष्य करतो. निर्माते अमोल कागणे, लक्ष्मण कागणे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा व संवाद निशांत धापसे यांचे आहेत. छायांकन रमणीरंजनदास याचं असून संकलन निलेश गावंड याचं आहे. संगीताची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली असून आदर्श शिंदे व विजय गटलेवार यांचे सूर चित्रपटातील गीतांना लाभले आहेत.

First Published on January 30, 2016 2:26 pm

Web Title: halal movie selected for aurangabad international film festival