News Flash

#MeToo मोहिमेला यश; बलात्कारी निर्मात्याला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

१०० पेक्षा अधिक अभिनेत्रींनी 'या' निर्मात्यावर आरोप केले होते.

हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वे वेन्स्टिनवर करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे अरोप अखेर सिद्ध झाले आहेत. या आरोपाखांली हार्वेला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षात ‘# मी टू’ या चळवळीअंतर्गत अँजेलिना जोली, एशिया अर्गेटो, ग्वेनेथ पाल्ट्रो, लॉरेन सिवन, एमा वॉटसन यांसारख्या तब्बल १०० पेक्षा अधिक प्रतिष्ठित अभिनेत्रींनी हार्वेविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यांपैकी लॉरेन यंग, टॅरेन वुल्फ, डॉन डनिंग, मिरियम हॅले, अ‍ॅनाबेला सायरोरा या पाच अभिनेत्रींनी केलेले आरोप अखेर न्यायालयात सिद्ध झाले आहेत. परिणामी हार्वेला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हार्वेने या अभिनेत्रींना चित्रपटात काम मिळवून देण्याचे अमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केले. हार्वेवर या अभिनेत्रींनी थर्ड डिग्री रेपचा अरोप केला होता. हे आरोप पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत.

खरं तर गेल्या महिन्यात २५ फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीतच हार्वेवरील बलात्काराचे आरोप सिद्ध झाले होते. मात्र शिक्षा सुनावण्याआधीत त्याच्या छातीत दुखायला लागले. परिणामी हार्वेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्याची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे रुग्णालयातून थेट त्याची रवानगी आता तुरुंगात करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 12:08 pm

Web Title: harvey weinstein sentenced to 23 years in prison mppg 94
Next Stories
1 Ranji Trophy : सौराष्ट्राला दहा हत्तींचं बळ, टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू अंतिम फेरीत खेळणार
2 अमेय खोपकरांचा झी स्टुडिओजला ‘दे धक्का’
3 भारतीय पाहुणचाराने भारावून गेलो आहे : डोनाल्ड ट्रम्प
Just Now!
X