बॉलिवूडमध्ये चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रसिद्धी त्यांच्या खासगी जीवनातील विविध चर्चांमुळे मिळते. अभिनेते आणि अभिनेत्रींची नाती, त्यांच्या नात्यात येणारी वळणं, त्यानंतर विकोपास गेलेल्या वादामुळे समोर येणारी घटस्फोटाची उदाहरणं हे सर्व काही विविध चर्चांना वाव देतं. काही सेलिब्रिटी कुटुंबांच्या बाबतीत हे सर्व अपवाद ठरलं असलं तरही, सुरुवातीच्या काळात सर्व काही सुरळीत सुरु असलेल्या अशाच काही कलाकार जोडप्यांची चर्चा नेहमीच रंगते. त्यातूनही बॉलिवूडमध्ये नात्यात आलेल्या दुराव्यामुळे एकल पालकत्त्व स्वीकारलेल्या अभिनेत्रींची यादीही लहान नाही. यामध्ये घटस्फोटानंतर मुलांची जबाबदारी घेत त्यांचं योग्य त्या पद्धतीने संगोपन करणाऱ्या आणि लग्न न करताच पालकत्त्व स्वीकारणाऱ्या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. या आहेत, बी- टाऊनच्या काही सिंगल मदर्स..

करिष्मा कपूर- संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री करिष्मा कपूरनेच तिच्या मुलांचं पालनपोषण केलं. करिष्माला एक मुलगी आणि एक मुलगा असून बऱ्याच कार्यक्रमांना ती त्यांच्यासोबत हजेरी लावते. तिच्या मुलीचं नाव समीरा आणि मुलाचं नाव किआन राज कपूर आहे. काही दिवसांपूर्वीच करिष्माच्या पूर्वाश्रमीच्या पतीने प्रिया सचदेवसोबत दुसरं लग्न करत एका नव्या जीवनाला सुरुवात केली आहे.
karishma

रवीना टंडन- १९९५ मध्ये अभिनेत्री रवीना टंडनने दोन मुलींना दत्तक घेतलं. रवीनाच्या मोठ्या मुलीचं म्हणजेच छायाचं लग्नसुद्धा झालं आहे. अनिल थडानीसोबत विवाहबंधनात अडकल्यानंतरही रवीनाचं कुटुंब पूर्ण झालं.
raveena

सुश्मिता सेन- सौंदर्य आणि मातृत्त्वाची परिभाषा बदलणारी बी- टाऊन अभिनेत्री म्हणजे सुश्मिता सेन. सुश्मिताने २००० साली रिनीला दत्तक घेतलं. त्यानंतर २०१० मध्ये तिनं अलिशाचं पालकत्त्वं स्वीकारलं. सुश्मिता अविवाहित असूनही या दोन्ही मुलींचं संगोपन तिने उत्तमरित्या केलं आहे. त्यामुळे ती सर्वात प्रसिद्ध अशी ‘सिंगल मदर’ म्हणूनही ओळखली जाते.
sush6_

अमृता सिंग – सैफ अली खान आणि अमृता सिंग हे असं एक सेलिब्रिटी कपल आहे ज्यांच्या नात्याविषयी बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. सैफसोबतच्या १३ वर्षांच्या वैवाहिक नात्यात दुरावा आल्यानंतर मुलांची जबाबदारी स्वत:कडे घेत अमृताने सारा आणि इब्राहिमचं संगोपन केलं. सध्या सारा बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीत असून येत्या काळात इब्राहिमसुद्धा चित्रपटसृष्टीत झळकू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
amrita

नीना गुप्ता- बॉलिवूड दिवा नीना गुप्ता प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताची आई आहे हे तर बऱ्याचजणांना ठाऊकही नसेल. वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत नीना गुप्ता यांचं नाव जोडलं गेलं, किंबहुना त्यांचं नातं सर्वांनाच माहितीये. पण, या जोडीनं कधीच लग्न केलं नाही. दिल्लीस्थित एका व्यक्तीसोबत विवाहबंधनात अडकलेल्या नीना यांनी मसाबाला नेहमीच प्राधान्य दिलं आहे.
neena-060517

पूजा बेदी- टेलिव्हिजन विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री पूजा बेदी. १९९० मध्ये पूजाने फरहान इब्राहिम या व्यावसायिकासोबत लग्न केलं. पण, फरहानसोबतचं तिचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्याच्यासोबत वेगळं होत पूजाने ओमार आणि आलियाची जबाबदारी स्वीकारत एकटीनेच त्यांची काळजी घेतली.
pooja

रिना दत्त- परफेक्शनिस्ट आमिर खानची पहिली पत्नी म्हणजे रिना दत्त. आमिर आणि रिनाला दोन मुलं आहेत. जुनैद आणि इरा ही त्यांची मुलं रिनासोबत राहात असून काही कार्यक्रमांना ते आमिरसोबतही दिसतात. रिनासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आमिरने किरण रावसोबत नव्या नात्याची सुरुवात केली.
reena-dutta

बबिता- बॉलिवूड आणि कपूर कुटुंब या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणायला हरकत नाही. याच कुटुंबात रणधीर कपूर आणि बबिता या सेलिब्रिटी जोडप्याच्या नात्याला तडा गेल्यानंतर करिना आणि करिष्माची संपूर्ण जबाबदारी घेत बबिता यांनी त्या दोघींचाही सांभाळ केला.
kareena

सारिका- १९८५ मध्ये अभिनेत्री सारिकाने दाक्षिणात्य चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. सारिका आणि कमल यांना दोन मुली आहेत. श्रुती आणि अक्षरा या त्यांच्या दोन्ही मुली अभिनय श्रेत्रात सक्रिय आहेत. कमल हसन आणि सारिका यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यापासून मुलींची जबाबदारी सारिकाने आपल्या हाती घेतली होती.
sarika4