News Flash

…म्हणून कंगना म्हणते, आयटम साँग नको रे बाबा!

बऱ्याच बाबतीत कंगनाने तिचं वेगळेपण सिद्ध केलं आहे.

कंगना रणौत

आपल्या अभिनयाच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री कंगना रणौतने स्वत:ची ओळख प्रस्थापित केली. या कलाविश्वात प्रवेश केल्यापासून अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. किंबहुना याच अडचणींवर मात करत तिने यश संपादन केलं. कंगनाकडे पाहून अनेक नवोदित कलाकारांनी आदर्शही घेतला आहे. अशी ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांच्या निवडीबाबत नेहमीच सजग असते. चित्रपटातील भूमिका आणि कथानकाला ती नेहमीच प्राधान्य देते. पण, तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत आयटम साँगवर थिरकताना तिला फार कमीच पाहिलं गेलं. खरंतर आयटम साँग आणि कंगना हे समीकरणच मुळात कधी जमून आलं नाही, असंच म्हणावं लागेल.

‘नवभारत टाईम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आयटम साँग हे अश्लील आणि अतिशय मादक असतात, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घातली गेली पाहिजे असं कंगनाचं ठाम मत आहे. आपल्या आणि समाजाच्या दृष्टीने चुकीच्या असणाऱ्या गोष्टींमध्ये कधीच योगदान देणार नसल्याची भूमिका तिने घेतली आहे. सारं जग ज्या गोष्टींमागे धावतं, त्या गोष्टी करण्याला आपण कधीच प्राधान्य देत नसल्याचं कंगणाचं मत आहे. नेहमी आपल्याला आनंद देणाऱ्याच गोष्टींना प्राधान्य देत फेअरनेस क्रिमच्या जाहिराती न करण्यापासून ते कोणा मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर न करण्यापर्यंत बऱ्याच बाबतीत कंगनाने तिचं वेगळेपण सिद्ध केलं आहे.

‘त्या’ तिघांमुळे माझ्या आयुष्याची कहाणीच बदलली- सनी लिओनी

कंगना सध्या ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटातून ती मुख्य भूमिकेत दिसणार असून, झाशीच्या राणीचं पात्रं रंगवण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालं. कंगना तिच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबासोबतही काही खास क्षण व्यतीत करत असते. कंगना सध्याच्या घडीला यशशिखरावर असली तरीही या क्षेत्रात हे यश तिच्या वाट्याला इतक्या सहजासहजी आलेलं नाही, ही बाब सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे आता येत्या काळात ही ‘क्वीन’ आणखी किती पुढे जाते आणि प्रेक्षकांच्या मनात असणारं तिचं स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 12:55 pm

Web Title: here is why bollywood actress kangna ranaut does not do item numbers in movies
Next Stories
1 Parmanu row: जॉन अब्राहमच्या अडचणीत वाढ, ‘जेए एंटरटेन्मेंट’विरोधात गुन्हा दाखल
2 शेवटची दोन वर्षंच राहिली आयुष्याची- केआरकेचा धक्कादायक खुलासा
3 बिग बींच्या फोनचं मध्यरात्री अचानक गेलं नेटवर्क, म्हणाले…
Just Now!
X