News Flash

वडिलांच्या निधनानंतर हिना खानने चार दिवसानंतर लिहीली पोस्ट; “ज्यांनी माझं सांत्वन केल..”

सोशल मिडीयावरून घेतेय ब्रेक

काही दिवसांपुर्वीच अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान ही तिच्या एका प्रोजेक्टच्या शुटींगसाठी काश्मिरमध्ये होती. हिना खानच्या वडिलांचं निधन झालेलं कळताच तिच्या फॅन्ससह इतर सेलिब्रीटीजनी ही तिचं सांत्वन केलं. वडिलांच्या निधनानंतर चार दिवसाने हिना खानने आता सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केलीय. यात ती काही दिवसांसाठी सोशल मिडीयावरून ब्रेक घेणार असल्याचं तिनं सांगितलं आहे.

वडिलांचं जाणं तिला अत्यंत अवघड जात असल्यानं तिनं सोशल मिडीयावरून काही दिवसांसाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय. इस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत तिनं लिहीलं, ”माझे वडिल 21 एप्रिल 2021 रोजी स्वर्गवासी झाले. ज्यांनी ज्यांनी माझ्या या कठिण काळात माझं सांत्वन केलं, त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. या धक्क्यातून मी आणि माझे कुटूंब अजुनही सावरू शकलो नाही. त्यामुळे पुढचे काही दिवस मी सोशल मिडीयावरून ब्रेक घेतेय. माझी टीम माझ्या सर्व प्रोजेक्टबद्दल माहिती देईल. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि सहकार्यासाठी खूप खूप आभार. ” असं ती या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

 

वडिलांच्या जाण्याने हिना खानला मोठा धक्का बसलाय. हिना खान आणि तिचे वडिल असलम खान या दोघांचे नाते वडिल-मुलीच्या नात्यापेक्षाही जास्त घट्ट होते. गेल्याच वर्षी लॉकडाऊन संपल्यानंतर हिना खान आपल्या वडिलांना सोबत घेऊन मालदीवला गेली होती. त्यावेळचे अनेक फोटोज तिने ‘फादर्स डे’ च्या दिवशी आपल्या इस्टाग्रामवर शेअर केले होते.

हिना खानच्या वडिलांच्या निधनानंतर सर्व कलाकारांनी तिचं सांत्वन केलं. मात्र तिची जवळची मैत्रिण गौहर खानने पोस्ट करून सांत्वन केले नाही म्हणून ती सध्या सोशल मिडीयावर ट्रोल होतेय. गौहरच्या वडिलांच्या मृत्यूनंतर हिनाने सोशल मीडियावर पोस्ट करत गौहरचं सांत्वन केलं होतं. तिच्या कठिण काळात त्यावेळी हिना खानने हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला आधार दिला होता. परंतू हिना खानच्या वडिलांच्या मृत्यूवर गौहर खानने कोणतीच पोस्ट लिहीली नाही. हिना खानच्या वडिलांच्या मृत्यूनंतर गौहर लाइव्ह सेशन करत असताना एका फॅनने तिला यावरून ट्रोल केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 4:56 pm

Web Title: hina khan takes a break from social media after her fathers demise prp 93
Next Stories
1 जाणून घ्या, कधी आणि कुठे पाहता येईल ऑस्कर पुरस्कार सोहळा!
2 “तुम्हाला कोणत्याही सरकारवर, नेत्यावर टीका करण्याची परवानगी…”- अभिनेता वीर दासचं ट्विट व्हायरल
3 “महासत्ता होणार म्हणे…महाथट्टा नक्कीच झालीय”, हेमंत ढोमेची संतप्त प्रतिक्रिया!
Just Now!
X