25 October 2020

News Flash

“माझ्या खात्यात भरपूर पैसे आहेत काळजी नसावी”; आदित्य नारायणचं ट्रोलर्सना प्रत्युत्तर

खात्यात केवळ १८ हजार शिल्लक असल्यामुळे आदित्यला केलं जात होतं ट्रोल

प्रसिद्ध गायक आदित्य नारायण आपल्या आर्थिक बाबींमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. आदित्य आर्थिक टंचाईत असून त्याच्या खात्यात आता केवळ १८ हजार रुपये शिल्लक आहेत अशी चर्चा सर्वत्र आहे. मात्र त्याने हा दावा फेटाळून लावला आहे. “मी अद्याप दिवाळखोरी जाहीर केलेली नाही. माझ्या खात्यात भरपूर पैसे आहेत. कोणीही अफवा पसरवू नये.” अशी विनंती त्याने आपल्या चाहत्यांना केली आहे.

अवश्य पाहा – अक्षयच्या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’? ट्रोलर्सने केली ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घालण्याची मागणी

हे प्रकरण काय आहे?

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. या प्रतिकूल परिस्थितीचा फटका उदित नारायण यांचा मुलगा आदित्यला देखील बसला अशी सर्वत्र चर्चा आहे. त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरु झाली. दरम्यान इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत आदित्यने आपल्या आर्थिक स्थितीवर भाष्य केलं.

अवश्य पाहा – निया शर्माची आजीबाईंसोबत ‘झिंगाट फुगडी’; व्हिडीओ होतोय व्हायरल…

तो म्हणाला, “मी अद्याप दिवाळखोरी जाहीर केलेली नाही. माझ्या खात्याते पुरेसे पैसे आहेत. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मी माझ्या खात्यात १८ हजार रुपये शिल्लक असल्याचं म्हटलं होतं. पण ते वाक्य चुकीच्या पद्धतीने काही जणांनी उचलून धरलं. या अफवेमुळे माझे कुटुंबीय चिंतेत आहेत. माझे मित्रमंडळी दररोज मला फोन करतायेत. लॉकडाउनमुळे मला देखील इतर कलाकारांप्रमाणे काम मिळत नव्हतं. पण आता माझ्याकडे भरपूर काम आहे. शिवाय पुरेसे मानधन देखील मिळत आहे. मी कुठल्याही प्रकारे आर्थिक संकटात सापडलेलो नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 3:57 pm

Web Title: i am not bankrupt aditya narayan mppg 94
Next Stories
1 ड्रग्ज प्रकरणात विवेक ऑबेरॉयच्या पत्नीला क्राइम ब्रांचची नोटीस
2 नव्या चित्रपटाची घोषणा करत कंगनाने जया बच्चन यांच्यावर साधला निशाणा, म्हणाली…
3 अक्षयच्या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’? ट्रोलर्सने केली ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घालण्याची मागणी
Just Now!
X