विराट आणि अनुष्काचे लग्नाचे फोटो जेव्हा पहिल्यांदा मी पाहिले तेव्हा मला रडूचं अनावर झालं असं अभिनेत्री सोनम कपूरनं नुकतंच दिग्दर्शक करण जोहरसमोर कबुल केलं. सोनमनं नुकतीच आपल्या दोन्ही भावंडासोबत ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये उपस्थिती लावली. यावेळी, ‘बॉलिवूडमधली कोणती जोडी त्यांच्या लग्नाच्या दिवशी सर्वाधिक सुंदर दिसत होती?’ असा प्रश्न करणनं तिला विचारला.
या प्रश्नावर सोनमनं बॉलिवूडमधल्या कोणत्याही जोडीबद्दल बोलण्यास नकार दिला. ‘प्रत्येक अभिनेत्री ही तिच्या लग्नाच्या पेहरावात सुंदरच दिसत होती त्यामुळे एकीबद्दल सांगता येणार नाही. मात्र जेव्हा अनुष्का- विराटच्या लग्नाचे फोटो मी पाहिले तेव्हा मला रडूच आलं. मी पहिल्यांदाच असं लग्न पाहत होते त्यामुळे इटलीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या फोटोत सुंदर दिसणाऱ्या अनुष्काला पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले’ असं सोनम म्हणाली.
अनुष्का आणि विराट डिसेंबर २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले. तर मे २०१८ मध्ये सोनम कपूर विवाहबंधनात अडकली. दिल्लीस्थीत व्यावसायिक आनंद आहुजासोबत सोनमनं लग्नगाठ बांधली. याच वर्षांत दीपिका पादुकोन रणवीर सिंग सोबत तर प्रियांका चोप्रा अमेरिकन गायक निक जोनाससोबत विवाहबंधनात अडकली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 31, 2018 10:04 am