News Flash

होय, मी गुपचूप लग्न केलंय- हुमा कुरेशी

आता ती तिच्या बाळाची वाट पाहतेय.

हुमा कुरेशी

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटात खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत झळकणार आहे. या आगामी चित्रपटाव्यतिरीक्त हुमा आणखी एका कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेता, निर्माता सोहेल खान याच्यासह हुमाचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा बॉलीवूड वर्तुळात सुरु आहेत. त्यावर आता हुमाने त्यांच्यात तसे काहीही नसल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे.

पिंकविला या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत हुमाने तिने गुपचूप लग्न केल्याच्या चर्चेवर लक्ष केंद्रित केले. सदर संकेतस्थळाला मुलाखत देत असताना हुमाने मध्येच उपरोधकपणे, माझं लग्न झालं आहे. मी गुपचूप लग्न केलं, असे म्हटले. त्यानंतर लगेच अक्षयने म्हटले की, आता ती तिच्या बाळाची वाट पाहतेय. अगदी खोडकरपणे या दोन्ही कलाकारांनी हुमाच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ या आगामी सिनेमाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायलयाने या सिनेमा विरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या सिनेमात वकिलांची किंवा न्यायाधीशांची बदनामी करण्यात आली आहे असा आरोप या सिनेमावर करण्यात आला होता. अजय कुमार वाघमारे नावाच्या एका वकिलाने उच्च न्यायालयात या सिनेमा विरोधात याचिका दाखल करत म्हटले होते की, या सिनेमाच्या नावातून एलएलबी हा शब्द वगळण्यात यावा तसेच न्यायालयात वकील पत्ते खेळताना दाखवण्यात आले असल्याचे दृश्यही वगळण्यात यावे अशी मागणी त्याने केली होती. याचिकेत हेही सांगण्यात आले होते की कायद्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत काही प्रतिबंधनही आहेत. याचिकेनुसार या सिनेमात न्यायालयाशी निगडीत लोकांचे विनोदी चित्रण करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औंरगाबादच्या खंडपीठाने ‘जॉलीएलएलबी २’ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वी पाहण्यासाठी दोन अमायकस क्युरीची (न्याय मित्र) नियुक्ती केली होती. त्यामुळे अजूनही या सिनेमाच्या प्रदर्शनावर टांगती तलवारच आहे असे म्हणावे लागेल. कारण याचा अंतिम निर्णय ३ फेब्रुवारीला होणार आहे.

‘जॉली एलएलबी’ या सुभाष कपूर दिग्दर्शित सिनेमाच्या त्याच नावाने येणाऱ्या सिक्वलमध्ये अक्षय कुमार जॉलीच्या म्हणजेच जगदीश्वर मिश्राच्या मुख्य भूमिकेत आहे. याआधीच्या सिनेमात जॉलीची भूमिका अभिनेता अर्शद वारसीने केली होती. मात्र सिक्वलमध्ये अक्षय कुमारची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘जॉली एलएलबी २’ चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. एका किचकट खटल्यामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे शोधण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींवर मात करणारा ‘जॉली’ आणि त्याच्या वाटेमध्ये अडथळा बनून येणारे काही लोक यावर हा ट्रेलर भाष्य करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 5:01 pm

Web Title: i have already gotten married its a secret shaadi quips huma qureshi
Next Stories
1 ‘चाहूल’मध्ये रंगणार सर्जेरावच्या लग्नाचा सोहळा
2 लव्ह स्टोरीत रंगवलेल्या गाण्याची अजब कहाणी
3 प्रियांका म्हणते, ‘मला तुझी गरज आहे’
Just Now!
X