सलमानशी बोलण्यापूर्वी मी दहावेळा विचार करते, असे सलमानची ‘जय हो’ चित्रपटातील सहकलाकार डेसी शाह हिने म्हटले आहे.
डिझायनर ईषा अमिन हिच्या स्प्रिंग समर कलेक्शनच्या अनावरणाला डेसी पोहचली होती. त्यावेळी ती म्हणाली की, सलमानला पहिल्यांदा भेटणे हा माझ्यासाठी ‘फॅन मुमेन्ट’ होता. त्यासमोर तोंड उघडण्यापूर्वी मी दहावेळा विचार करते. तो खूप प्रेमळ आहे. मी त्याची खूप मोठी चाहती आहे. कधीही मी जेव्हा त्याला बघते किंवा भेटते तेव्हा मला शब्दचं सुचत नाहीत, असे डेसी म्हणाली.
डेसीने ‘जय हो’ आणि ‘हेट स्टोरी २’ हे चित्रपट केले आहेत.