19 September 2018

News Flash

अनुष्कासमोरच ‘ती’ने व्यक्त केले विराटवरील प्रेम?

तिने अनुष्कासमोरच तिच्या प्रेमाची ग्वाही दिली.

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याच्यासोबत असलेले अनुष्का शर्माचे प्रेमसंबंध कोणापासून दडलेले नाहीत.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या आगामी ‘फिल्लौरी’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. पण, त्याव्यतिरीक्त अनुष्का तिच्या खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत असते. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याच्यासोबत असलेले तिचे प्रेमसंबंध कोणापासून दडलेले नाहीत. विराट बरेचदा सोशल मीडियावरून त्याच्या भावना व्यक्त करत असतो. पण, अनुष्कावर याचा काहीच परिणाम होत नसल्याचे दिसते. तिने अजूनपर्यंत त्यांच्या नात्याविषयी मौन बाळगणेच पसंत केले आहे. मात्र, या दोघांवरही माध्यमांच्या नजरा नेहमीच खिळलेल्या असतात. ‘फिल्लौरी’च्या प्रसिद्धीकरिता अनुष्काने नुकतीच ‘इंडियन आयडॉल ९’ या रिअॅलिटी शोमध्ये उपस्थिती लावली होती.

‘इंडियन आयडॉल ९’ सेटवरील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षक आणि अनुष्का शर्माकडून प्रतिक्रिया ऐकल्यानंतर या शोमधील स्पर्धक मालविका सुंदर हिने विराटवर असलेले तिचे प्रेम व्यक्त केले. विशेष म्हणजे तिने अनुष्कासमोरच तिच्या प्रेमाची ग्वाही दिली. आपल्याला पुन्हा कधी बोलण्याची संधी मिळेल किंवा नाही या विचारात मालविकाने तिच्या मनातील भावना अनुष्कासमोर व्यक्त केल्या. ती अनुष्काला म्हणाली की, मी तुझी चाहती आहे. पण त्याहीपेक्षा मी क्रिकेट आणि विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. त्यावर अनुष्कानेही ‘तुझा संदेश मी पुढे पोहोचवेन’, असे तिला सांगितले.

HOT DEALS
  • Moto G6 Deep Indigo (64 GB)
    ₹ 15735 MRP ₹ 19999 -21%
    ₹1500 Cashback
  • Honor 8 32GB Pearl White
    ₹ 14210 MRP ₹ 30000 -53%
    ₹1500 Cashback

anushka-sharma-15

‘इंडियन आयडॉल’चे नववे पर्व सध्या सुरु असून, फराह खान, सोनू निगम आणि अनू मलिक हे याचे परीक्षण करत आहेत. या पर्वातील पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये मालविकाचे नाव येते. यावेळच्या भागात मालविकाने अनुष्काचा चित्रपट ‘दिल धडकने दो’मधील ‘गर्ल्स लाइक टू स्विंग’ हे गाणे गायले.

२८ वर्षीय अभिनेत्री अनुष्का तिच्या ‘फिल्लौरी’ या आगामी चित्रपटाची सोशल मीडिया आणि टेलिव्हिजन शोमध्ये जोरात प्रसिद्धी करत आहे. #ShahiWasThere अशा हॅशटॅगसह एका वेगळ्या पद्धतीने अनुष्का चित्रपटाची प्रसिद्धी करताना दिसते. ‘फिल्लौरी’ चित्रपट ही एका भूताची प्रेमकथा आहे. अनुष्का शर्मा, दिलजीत दोसांज आणि सूरज शर्मा यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. अनुष्का शर्माच्याच निर्मिती संस्थेअंतर्गत ‘फिल्लौरी’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, तिची निर्मिती असलेला हा दुसरा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर चर्चेत असून, अनुष्काचा भुताचा अवतारही सर्वांचीच मनं जिंकत आहे.

First Published on March 17, 2017 9:54 am

Web Title: indian idol 9 when a virat kohli fan confessed her love for him to anushka sharma