News Flash

‘ईन्शाल्ला’मध्ये ४० वर्षांचा सलमान आणि आलियाची ही असेल कथा

या चित्रपटात आधी सलमानसोबत शाहरुख खानच्या नावाचीही चर्चा होती

सलमान आणि आलिया

‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात सलमानने भन्साळींसोबत काम केले होते. त्यानंतर या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. या चित्रपटानंतर १९ वर्षांचा काळ लोटला पण दिग्दर्शक भन्साळी आणि सलमानची जोडी काही एकत्र काम करताना पाहायला मिळाली नाही. आता मात्र इतक्या वर्षांनंतर सलमान संजय लीला भन्साळी यांच्या ‘ईन्शाल्ला’ चित्रपटात सलमान काम करण्यास तयार झाला आहे. या चित्रपटात सलमानसह अभिनेत्री अलिया भट्ट देखील काम करणार आहे. तसेच या दोघांची जोडी रोमॅन्टीक रुपात दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे.

‘ईन्शाल्ला’ चित्रपटात सलमान ४० वर्षांच्या एका उद्योगपतीची भूमिका साकारणार आहे. तर २० वर्षांची आलिया इन्डस्ट्रीमधील नव्या अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्या दोघांच्या वयातील फरक अधोरेखित करण्यात आला आहे. तसेच चित्रपटात त्या दोघांची जोडी रोमॅन्टीक अंदाजात दिसणार आहे. सलमान आणि आलियाची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

भन्साळींच्या या चित्रपटात आधी सलमानसोबत शाहरुख खानच्या नावाचीही चर्चा होती. त्याचप्रमाणे भन्साळी अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी आग्रही असल्याचेही म्हटले जात होते. पण अखेर सलमान आणि आलियाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

सध्या सलमान ‘दबंग ३’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात सलमानसह सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच आलिया राजामौली यांच्या ‘RRR’ आणि ‘सडक २’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. भन्साळींच्या ‘ईन्शाल्ला’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सप्टेंबर महिन्यात सुरूवात होणार असून पुढच्या वर्षी ईदला चित्रपट प्रदर्शित होणार आहे असे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 12:01 pm

Web Title: inshallah will have salman as a 40 year old man and alia bhatt as a young actor
Next Stories
1 तनुश्रीच्या आरोपांवर अजय देवगणचं स्पष्टीकरण
2 अभिनेत्री किम शर्माविरोधात पोलिसांत तक्रार
3 इन्स्टाग्रामवर प्रभासचा पहिला फोटो; चाहत्यांकडून लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव
Just Now!
X