News Flash

‘रुही’ने केली कोटीत कमाई; तेही पहिल्याच दिवशी!

करोना काळातही दमदार कमाई....

नुकताच प्रदर्शित झालेला जान्हवी कपूरचा चित्रपट ‘रुही’ सध्या चांगलाच गाजत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. करोना महामारीनंतरचा हा सगळ्यात हिट चित्रपट ठरला आहे.

जान्हवी कपूर, राजकुमार राव, वरुण शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला, हार्दिक मेहता दिग्दर्शित या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. करोना महामारी असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३ कोटीहूनही अधिक कमाई केली. अजून चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत. हळूहळू ती सुरु होत आहेत.

अशा परिस्थितीत या चित्रपटाची पहिल्या दिवसाची ३ कोटींची कमाई ही ९-१० कोटींसारखीच म्हणावी लागेल. करोना काळात या आधी कोणत्याही चित्रपटाने पहिल्या दिवशी इतकी कमाई केलेली नाही. चित्रपट विश्वातल्या अनेकांनी याबद्दल या चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले आहे.

२०१९ सालच्या ‘स्त्री’ या चित्रपटाचाच हा पुढचा भाग आहे. त्यात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव हे प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात जान्हवी एका गावातल्या मुलीची भूमिका साकारत आहे. राजकुमार आणि वरुण यांनी साकारलेली पात्र या मुलीचं अपहरण करतात आणि मग त्यांना तिच्या चेटकीण असण्याबद्दल कळतं. साधारण अशा पद्धतीची ही कथा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 12:54 pm

Web Title: janhavi kapoor rajkumar rao varun sharma starrer roohis box office collection vsk 98
Next Stories
1 दंगल गर्ल फातिमाचा दमदार डान्स; व्हिडीओ पाहून अनिल कपूर म्हणाले..
2 रील टू रियल हीरो, महेश बाबूमुळे गरीब मुलाला मिळाले जीवनदान
3 Video: फोटोग्राफरवर ओरडला तैमूर अन्…, करीना कपूर झाली रागाने लाल
Just Now!
X