News Flash

जान्हवीच्या डान्सचा जलवा, पहिल्याच आयटम साँगवर चाहते घायाळ

जान्हवीच्या बोल्ड लूकची जोरदार चर्चा

अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच ‘रुही’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. 11 मार्चला रुही’ सिनेमा चित्रपटगृहात धडकणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता मात्र चांगलीच ताणली गेली आहे. या सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसोबत वरुण शर्माची खास विनोदी शैली प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

तर पनघट’ हे ‘रुही’ सिनेमाचं पहिलं गाणं आयाधी रिलीज झालं होतं. त्यानंतर नुकतच या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज झालंय. हे एक आयटम साँग असून जान्हवीचा बोल्ड अंदाज या गाण्यात दिसून येतोय. जान्हवी कपूरचं हे पहिलंच आयटम साँग आहे. ‘नदियो पार’ हे जान्हवीचं पहिलंचं आयटम साँग सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतं आहे. या गाण्याला चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय. या गाण्यातील जान्हवीच्या अदाकारीने तर चाहत्यांना पुरतं घायाळ केलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

गोल्डन ड्रेसमधला जान्हवीचा हॉट लूक आणि तिच्या जबरदस्त डान्सने अनेकांना वेड लावलं आहे. जान्हवीने तिच्या आयटम साँगचा व्हिडीओ इन्स्टाग्रावरही पोस्ट केलाय. या पोस्टवर अनेकांनी तिचं कौतुक केलंय. अभिनेत्री कतरिना कैफने हार्ड आणि फायरचं इमोजी कमेंटमध्ये देत जान्हवीच्या डान्सला पसंती दिलीय.

2004 मध्ये ‘नदियो पार’ या गाण्यानं धुमाकुळ घातला होता. यानंतर ‘रुही’ सिनेमासाठी हे गाणं रीकंपोज करण्यात आलंय. शामूरनेच हे गाणं पुन्हा गायलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी कपूर एक उत्तम डान्सर आहे. सोशल मीडियावर जान्हवी तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. याआधी रिलीज झालेल्या ‘पनघट’ या गाण्याला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. या गाण्यात जान्हवीसोबत राजकुमार राव आणि वरुण शर्माचे ठुमके पाहायला मिळाले.

वरुण धवनची जान्हवीला टक्कर!

‘रुही’ हा हॉरर कॉमेडी सिनेमा असून दिनेश विजय यांनी सिनेमाची निर्मिती केलीय. या आधी ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी सिनेमाची त्यांनी निर्मिती केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 4:40 pm

Web Title: janhvi kapoor first item song release trending on social media kpw 89
Next Stories
1 नेटफ्लिक्सची मेजवानी, या वर्षात घेऊन येणार 41हूनही अधिक नवे चित्रपट आणि शोज
2 कॉमेडी इतकंच रोमँटिक भूमिका साकारताना देखील दडपण असतं – सागर कारंडे
3 सनीच्या फोटो शूटमधील व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X