X

“आमचं लग्न टिकावं म्हणून मी त्याला सोडलं…”, जया बच्चन यांचा खुलासा!

आज जया बच्चन यांचा वाढदिवस; त्यानिमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी

पुढच्या दोन वर्षात अमिताभ आणि जया बच्चन हे दोघेही आपल्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव साजरा करतील. त्यांनी सर्व तरुणांसमोर, नव्या पिढीसमोर एक आदर्श घालून ठेवला आहे. प्रत्येक जोडप्याप्रमाणेच जया आणि अमिताभ यांच्या आयुष्यातही अनेक चढ-उतार आले. पण त्यांनी आपलं नातं, आपलं लग्न टिकवलं. फक्त टिकवलंच नाही तर आपला संसार आनंदीही ठेवला. त्यासाठी काही वेळा त्यांना काही कठोर पावलंही उचलावी लागली.

अनेक वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांच्या अफेअरबद्दलच्या चर्चा फार मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. त्यावेळी अमिताभ यांचं जया यांच्याशी लग्न झालेलं होतं. आजपर्यंत या चर्चांमध्ये नक्की किती तथ्य होतं ही गोष्ट गुलदस्त्यातच आहे. अशा चर्चांमुळे पती-पत्नीच्या नात्यावर परिणाम होणं साहजिक आहे. मात्र, लग्न टिकवायचं असेल, तर अशा परिस्थितीवर ही मार्ग काढावा लागतो. ही परिस्थिती हाताळण्याचा जया यांचा मार्ग अगदी वेगळा होता. त्यांनी मागे एकदा सांगितलं होतं की, लग्न टिकवण्यासाठी त्यांनी अमिताभ यांना काही काळ एकटं सोडलं होतं.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, “त्याला एकटं सोडून मला आमचं लग्न टिकवता येईल. आपल्याला विश्वास असणं महत्त्वाचं आहे. मी एका चांगल्या माणसाची लग्न केलं आहे आणि आपल्या शब्दाला जागणाऱ्या परिवाराशी नातं जोडलं आहे.
त्या पुढे म्हणाल्या, तुम्ही फार पझेसिव्ह असून चालत नाही. विशेषतः आमच्या क्षेत्रात जिथे कोणतीच गोष्ट सोपी नसते. तुम्ही एकतर त्या कलाकाराला संपवून टाकता किंवा त्याला किंवा तिला मोठं व्हायला मदत करता. पण जर तो तुमच्यापासून लांब गेला तर तो तुमचा नसतोच.”

आणखी वाचा- जया यांनी अमिताभ बच्चन यांच्या समोरच रेखाच्या कानशिलात लगावली अन्…

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याबद्दलच्या चर्चा अनेक वर्षे सुरुच आहेत. आजही त्यांच्याविषयी बोललं जातं. पण जया यांना सत्य काय ते कळलेलं असणारच असं दिसत आहे.

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे ३ जून १९७३ रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांना श्वेता आणि अभिषेक बच्चन अशी दोन मुलंही आहेत. अभिनेत्री म्हणून लोकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणाऱ्या जया यांनी आता आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे.

22
READ IN APP
X