09 August 2020

News Flash

‘माझ्या चित्रपटात काम करशील का?’ वडिलांच्या प्रश्नावर श्रिया पिळगांवकरचं थक्क करणारं उत्तर

श्रिया पिळगांवकरने कलाविश्वात स्वत:च स्थान निर्माण केलं आहे

सध्या छोट्या पडद्यावरील ‘दोन स्पेशल’ हा कार्यक्रम चांगलाच गाजत आहे. या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग प्रेक्षकांमध्ये गाजत असून आतापर्यंत अनेक मान्यवरांनी या शोच्या मंच्यावर हजेरी लावली आहे. त्यातच आता अभिनेता सचिन पिळगांवकर आणि अवधूत गुप्ते या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या शोमध्ये जितेंद्र जोशी प्रत्येक कलाकाराच्या जीवनातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या आयुष्यातील जगासमोर न आली गुपिते समोर आणण्याचा प्रयत्न करतो. यातच जितेंद्र जोशीने विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देतांना सचिन पिळगांवकर यांनी श्रियाच्या कलाविश्वातील पदार्पणाविषयीची थक्क करणारी गोष्ट सांगितली.

शोमध्ये रंगलेल्या प्रश्नोत्तराच्या खेळामध्ये जितेंद्रने तुम्ही श्रियाला अमूक गोष्ट कर किंवा करू नकोस असं काही सांगितलं आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतांना, “मी तिला कधीही या गोष्टी सांगण्याच्या भानगडीत पडलो नाही आणि ती कोणाचं ऐकणार सुद्धा नाही”. त्यावर अवधूतनेदेखील श्रियासोबत असलेल्या मैत्रीच्या नात्याविषयी सांगितलं. “आम्ही तिला चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. अवधूतने श्रियाविषयी आठवण सांगत असताना श्रियाला मी चित्रपटाची ऑफर दिल्यानंतर तिने पहिलं उत्तर काय दिलं हे सचिन पिळगांवकर यांनी सांगितलं.

अवधूतने श्रियाला कलाविश्वात येण्यासाठी प्रोत्साहन दिल्यानंतर मलाही असं वाटायला लागलं की श्रियाने चित्रपटात काम करावं. त्यावर मला चित्रपट करायचा आहे. तर तू त्यात काम करशील का? असा प्रश्न विचारला होता. विशेष म्हणजे “मला स्क्रिप्ट द्या त्यानंतर मी ठरवेन”, असं उत्तर श्रियाने दिलं. तिच्या या उत्तरानंतर मी थक्क झालो होतो.

दरम्यान, श्रिया पिळगांवकरने कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. या कार्यक्रमातून दिग्गज व्यक्तींच्या रोजच्या जगण्यातले अनुभव, त्यांची मते, त्यांचे विचार गप्पांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 4:10 pm

Web Title: jitendra joshi marathi show don special sachin pilgaonkar and shreya pilgaonkar ssj 93
Next Stories
1 हैदराबाद एन्काऊंटनंतर तापसी म्हणाली..
2 Teaser : धम्माल विनोदाचा ‘आटपाडी नाईट्स’
3 Video : गावात उभा राहिला धर्मेंद्र यांच्या स्वप्नांचा इमला
Just Now!
X