News Flash

मोदींच्या स्वागताला कैलाश खेर यांच्या गाण्यांची मेजवानी

कॅलिफोर्निया येथे अमेरिकास्थित भारतीय समाजातर्फे मोदींच्या स्वागतासाठी कार्यक्रम

कैलाश खेर हे नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाचे सदिच्छादूत देखील आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱयात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून २७ सप्टेंबरला मोदींच्या कॅलिफोर्निया भेटीवेळी त्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका खास कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या संगीताचा कार्यक्रम होणार आहे.

कॅलिफोर्निया येथे अमेरिकास्थित भारतीय समाजातर्फे मोदींच्या स्वागतासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कॅलिफोर्नियाच्या सॅन जोस येथील सॅप केंद्रात हा कार्यक्रम होणार आहे. मोदींच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमासाठी माझा रॉकबॅण्ड सज्ज असून कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळेल, अशी आशा कैलाश खेर याने व्यक्त केली आहे.

दरम्यान, कैलाश खेर हे नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाचे सदिच्छादूत देखील आहेत. खेर यांनी आजवर पाच हजारांहून अधिक बॉलीवूड गाणी गायली असून त्यांचे ‘तेरी दिवानी’ हे गाणे आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यांच्या ‘कैलासा’ या रॉकबॅण्डचे आजवर जगभरात एक हजाराहून अधिक कार्यक्रम झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2015 2:00 pm

Web Title: kailash kher to perform at modis reception in silicon valley
Next Stories
1 व्यापम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे ४० ठिकाणी छापे
2 ‘मुस्लिमांनी सर्व पर्याय आजमावले, एकदा भाजपला साथ देऊन पाहा’
3 खेळातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन अशक्य – आयसीसीच्या फ्लॅनागन यांचे मत
Just Now!
X